दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड- 19 च्या लॉकडाऊन काळात टपाल कार्यालयांकडून मुलभूत टपाल आणि आर्थिक सेवा प्रदान
प्रविष्टि तिथि:
27 MAR 2020 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2020
कोविड- 19 च्या लॉकडाऊन काळात टपाल कार्यालयांकडून मुलभूत टपाल आणि आर्थिक सेवा प्रदान केली जात आहे. पोस्टल नेटवर्कच्या मदतीने प्राधान्याने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. पोस्ट ऑफीस बचत बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंटस बँकेच्या ग्राहकांसाठी रक्कम काढणे आणि डिपॉझीट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. टपाल कार्यालयांमध्ये कोणत्याही बँकेतील खातेधारकांसाठी एटीएम सुविधा आणि एईपीएस (आधारप्रणित पेमेंट सिस्टीम) प्रदान केली जात आहे.
टपाल खाते अत्यावश्यक सेवा प्रदान करताना कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सुरक्षित सेवा प्रदान करत आहे.
R.Tidke/S.Thakur/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1608629)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English