वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ईपीसी अर्थात एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल्स च्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद
Posted On:
27 MAR 2020 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2020
कोविड-19 चा आणि लॉकडाऊनचा देशभरातील परिणाम तसेच या परिस्थितीत सुधारणा आणण्यासाठी त्यांचे अभिप्राय आणि सूचना जाणून घेण्याकरिता केंद्रीय रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विविध ईपीसी अर्थात एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल्स च्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान, परदेश व्यापार महासंचालक अमित यादव बैठकीला उपस्थित होते.
कोविड 19 महामारीचा त्यांच्या कार्यप्रणालीवर तसेच उद्योगांवर झालेला परिणाम यावेळी ईपीसीच्या प्रतिनिधींनी सांगितला तसेच या संकटातून बाहेर पडण्यासाठी बऱ्याच सुधारणाही सुचविल्या.
आयात-निर्यात ही देशासाठी महत्वाची बाब असली तरी 130 कोटी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी लॉकडाऊनची गरज आहे म्हणूनच यात समतोल साधून समस्या कमी करण्याच्या उपाययोजना सुरु आहेत , असे गोयल यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सरकारने बराच पुढचा विचार केलेला आहे परंतु अशा संकटकाळी प्रत्येकाने दुसऱ्याच्या अनुभवातून बोध घेऊन भविष्याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. या कॉन्फरन्समध्ये आलेल्या सूचनांचा त्वरित विचार करून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल तसेच निर्यातदार आणि आयातदारांच्या रास्त मागण्यांचा व्यावहारिक परिणाम शोधण्याचा सरकार प्रयत्न करेल असे आश्वासनही गोयल यांनी दिले.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1608620)