गृह मंत्रालय

परराज्यातून स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी यांच्यासाठी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक व्यवस्था करण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सूचना

Posted On: 27 MAR 2020 6:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मार्च 2020

 

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांच्या देशव्यापी लॉक डाऊनच्या काळात स्थलांतरीत कृषी मजूर, औद्योगिक कामगार आणि इतर  असंघटीत कामगारांसाठी अन्न आणि निवारा यासह आवश्यक बाबी पुरवण्या करिता तातडीने पावले उचलावी अशा सूचना केंद्रीय गृह सचिवानी, सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना केल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी, नोकरीसाठी इतर राज्यातून आलेल्या महिला यासारख्या  व्यक्तीना त्यांच्या सध्याच्या निवास व्यवस्थेतच राहू देण्याची परवानगी  देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

असंघटीत मजुरांसाठी, विशेषतः अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी,अन्न आणि निवारा पुरवण्यासाठी  स्वयंसेवी संस्थासह विविध एजन्सीच्या मदतीने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी  उपाय योजना कराव्यात असे या  सूचनावलीत नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थी आणि वसतिगृहात राहणाऱ्या  नोकरदार महिला यांना त्यांच्या सध्याच्या व्यवस्थेनुसारच  राहता  यावे यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन हॉटेल,भाडे तत्वावरची निवास व्यवस्था सुरूच राहीलआणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील  याची खातरजमा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी करावी असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

जीवनावश्यक सेवा आणि  वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखताना लॉक डाऊनचे काटेकोर पालन करत, याचा भंग करणाऱ्यांविरोधात कायद्याच्या विविध तरतुदी अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश वारंवार देण्यात येत आहेत. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1608590) Visitor Counter : 239


Read this release in: English