पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे राजपुत्र यांच्यात दूरध्वनीद्वारे संभाषण
Posted On:
26 MAR 2020 11:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीचे राजपुत्र शेख मुहम्मद बिन झयाद अल नहायान यांच्याशी दूरध्वनीद्वारे संभाषण साधले. दोन्ही देशांच्या नेत्यांनी आपल्या देशातल्या जगविख्यात महामारी कोवीड-19 संदर्भात सद्यस्थितीवर माहितीचे आदान-प्रदान केले. तसेच त्या त्या देशाच्या सरकारने केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत उचललेल्या पावलांवर ही चर्चा केली. दोन्ही देशांनी मान्य केले की, पुढील काही आठवडे करोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण करण्यासाठी अत्यंत कठीण आहे आणि सर्व देशांच्या सामूहिक प्रयत्नांद्वारेच हे शक्य होईल. यासंदर्भात अलीकडेच जी-20 देशांच्या नेत्यांच्या परिषदेने घेतलेल्या सामूहिक निर्णयांचे दोन्ही नेत्यांनी कौतुक केले.
दोन्ही नेत्यांनी एकत्रित यंत्रणा बळकटी आणि भरभराटीसाठी द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन दिले. सध्या परिस्थितीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी, देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी नियमित सल्लामसलत करून संबंध सुदृढ ठेवण्यावर आणि मुख्यतः लॉजिस्टिक पुरवठा मार्ग निरंतरपणे चालू ठेवण्यावर भर दिला.
शेख मोहम्मद बिन यांनी युनायटेड अरब अमिरात मध्ये राहणाऱ्या जवळपास दोन दशलक्ष भारतीयांच्या कल्याणाची जबाबदारी घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना आश्वासन दिले. पंतप्रधानांनी अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन यांचे भारतीयांची अशा परिस्थितीमध्ये सुरक्षा आणि आरोग्य संदर्भात घेण्यात येणारया काळजीसाठी आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीचे राजपुत्र, त्यांचे संपूर्ण राजघराण आणि आमिरातचे नागरिक यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
B.Gokhale/P.Kor
(Release ID: 1608587)
Visitor Counter : 178