आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 बाधित व्यक्ती सूचित करण्याबाबत खाजगी संस्थासाठी मार्गदर्शक तत्वे

Posted On: 27 MAR 2020 5:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मार्च 2020

 

कोविड-19 बाबत सध्याच्या परिस्थितीत आणि याचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजना दृढ करण्याच्या दृष्टीने,कोविड-19 ची लागण झालेली अथवा संशयित अशी प्रत्येक व्यक्ती विलग ठेवणे आणि अशा व्यक्तींना योग्य उपचार पुरवणे आणि या विषाणूच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी अशा व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची लवकरात  लवकर माहिती मिळवणे अतिशय महत्वाचे आहे. यासंदर्भात खाजगी क्षेत्राचे सहाय्य आणि सहकार्य महत्वाचे आहे. सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालये,सरकारी आरोग्य संस्थांमधले वैद्यकीय अधिकारी, आयुष व्यावसायिकांसह नोदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी कोविड-19 बाधित व्यक्तीबाबत  (जोडलेल्या परीशिष्टात  दिल्याप्रमाणे) संबधित जिल्हा देखरेख युनिटला सूचित करणे बंधनकारक  आहे. 

सर्व व्यावसायिकांनी  त्यांच्या माहितीतली एखादी व्यक्ती,कोविड-19 बाधित देशातून प्रवास करून आली असेल आणि कोविड-19चा संसर्ग झालेली म्हणून अथवा संशयित  आढळल्यास व्यावसायिकांनी स्वतःहून यासंदर्भातला फॉर्म (जोडल्याप्रमाणे) द्यायचा आहे.  गेल्या 14 दिवसात अशी पार्श्वभूमी असणाऱ्या  व्यक्तीला, कोविड-19 च्या व्याखेतली लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीचे  रुग्णालयात विलगीकरण करणे आणि नियमानुसार त्याची कोविड-19 साठी चाचणी करणे आवश्यक आहे. अशा सर्व प्रकरणांची माहिती राज्य हेल्प लाईन क्रमांकावर (यादी जोडलेली) आणि राष्ट्रीय हेल्प लाईन क्रमांक 1075 वर द्यायची आहे.         ncov2019[at]gov[dot]in. इथे ईमेल वर पाठवायचा आहे.

अनुक्रमांक   राज्य  हेल्प लाईन क्रमांक

1          आंध्र प्रदेश  0866-2410978

2          अरुणाचल प्रदेश 9536055743

3          आसाम 6913347770

4          बिहार  104

5          छत्तीसगड  077122-35091

6          गोवा 104

7          गुजरात  104

8          हरियाणा 8558893911

9          हिमाचल प्रदेश  104

10        झारखंड  104

11         कर्नाटक  104

12        केरळ  0471-2552056

13        मध्य प्रदेश 0755-2527177

14        महाराष्ट्र 020-26127394

15        मणिपूर  3852411668

16        मेघालय  108

17        मिझोरम 102

18        नागालॅड 7005539653

19        ओदिशा 9439994859

20        पंजाब  104

21        राजस्थान 0141-2225624

22        सिक्कीम  104

23        तामिळनाडू  044-29510500

24        तेलंगण 104

25        त्रिपुरा 0381-2315879

26        उत्तर प्रदेश 18001805145

27        उत्तराखंड  104

28        पश्चिम बंगाल 3323412600

 अनुक्रमांक  केंद्रशासित प्रदेश   हेल्प लाईन नंबर

1  अंदमान निकोबार बेट 03192-232102

 2  चंदीगड 9779558282

 3 दादरा नगर हवेली 104

दमण आणि दीव 104

 4  दिल्ली 011-22307145

 5 जम्मू  1912520982

काश्मीर   0194-2440383

 6  लडाख  01982-256462

 7 लक्षद्वीप 04896-263742

 8 पुद्दुचेरी 104

परिशिष्ट 1

कोविड -19 व्याख्या  आणि संशयित प्रकरण :  श्वसन विषयक तीव्र आजार ( ताप आणि श्वसन रोगाचे किमान एक लक्षण )(उदा. खोकला,श्वासाला त्रास)आणि ही लक्षणे आढळण्याच्या 14 दिवस आधी कोविड-19 चा प्रसार असलेल्या देश/ भागातून ( अद्ययावत यादीसाठी एनसीडीसी संकेत स्थळ पहा) प्रवास केल्याचा पूर्व इतिहास ,

किंवा

रुग्ण/तीव्र श्वसन विकार लक्षणे आध्ल्लेला आणि या लक्षणांपुर्वी 14 दिवस कोविड -19 रुग्णाच्या संपर्कात असलेला आरोग्य कर्मचारी

अथवा तीव्र श्वसन संसर्ग असलेला(ताप आणि श्वसन रोगाचे किमान एक लक्षण असलेला ( उदा.खोकलाश्वसनाला त्रास ) आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज असलेला रुग्ण

 

किंवा कोविड -19 ची निदान चाचणी

 

प्रयोगशाळेत निदान निश्चित झालेले प्रकरण

प्रयोगशाळेत कोविड- 19 चे निश्चित निदान झालेली व्यक्ती

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1608586) अभ्यागत कक्ष : 186