आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 मृतदेहाच्या व्यवस्थापनाची मार्गदर्शक तत्त्वे
Posted On:
27 MAR 2020 3:11PM by PIB Mumbai
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्यसेवा महासंचालनालय
कोविड- 19 मृतदेहाच्या व्यवस्थापनाची मार्गदर्शक तत्त्वे
कागदपत्राची व्याप्ती
नोवेल कोरोना व्हायरस रोगामुळे भारतात सध्या प्रयोगशाळेत सिद्ध झालेले शंभर पेशंट असून दोन मृत्यू घडले आहेत हा नवीन रोग असल्यामुळे या रोगामुळे मरण पावलेल्या पेशंटच्या मृतदेहाचे व्यवस्थापन करण्याबाबत ज्ञान अपुरे आहे
ही मार्गदर्शक तत्त्वे कोविड-19 या रोगाबाबतीत उपलब्ध ज्ञानावर आधारलेली आहेत. भारतात सध्या प्रवासामुळे संसर्ग झालेल्या तर काही थोड्या केसेस या जनतेत आपापसात संसर्ग झालेल्या आहेत. या टप्प्यावर सर्व संशयित तसेच खात्री झालेल्या केसेस या आरोग्य केंद्रांमध्ये अलगीकरण करून ठेवण्यात येतील त्यामुळे हे कागदपत्र केवळ इस्पितळात घडलेल्या मृत्यूबाबत मर्यादित असेल.
मुख्य तथ्य
कोविड-19 चा संसर्ग मुख्यत्वेकरून जलबिंदू (droplets) द्वारे होतो. मानक प्रक्रिया अवलंबणाऱ्या आरोग्य कर्मचारी किंवा कुटुंबीयांना मृतदेहाकडून संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.
मृत कोविड-19 पेशंटची केवळ फुप्फुसे ही शवविच्छेदनादरम्यान संसर्गजन्य असू शकतात.
कोविड-19 पेशंट चा मृतदेह हाताळताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालन करण्याची मानक प्रक्रिया
संसर्ग रोखणारी मानक प्रक्रिया पुर्णवेळ अवलंबली गेली पाहिजे ती खालील प्रमाणे
- हातांची स्वच्छता
- वैयक्तिक संरक्षक साधने जसे की जलरोधक एपरण, हातमोजे, मास्क, चष्मे
- अनुकुचीदार वस्तूंची काळजीपूर्वक हाताळणी
- कोविड-19 पेशंट चा मृतदेह असलेली पिशवी तसेच पेशंटसाठी वापरण्यात येणारी उपकरणे तसेच साधने यांचे निर्जंतुकीकरण करणे
- कपड्यांचे निर्जंतुकीकरण करणे, आजूबाजूचा पृष्ठभाग स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेला असावा
संसर्ग नियंत्रण पद्धतींचे प्रशिक्षण
अलगीकरण केलेली जागा, शवागार, ऍम्ब्युलन्स, स्मशान तसेच दफनभूमी आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाला मृतदेहाच्या हाताळणीचे प्रशिक्षण आणि संसर्ग नियंत्रण पद्धतीचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे
विलगीकरण कक्ष किंवा भागातून मृतदेहाची रवानगी
- मृतदेहाची हाताळणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी हातांची स्वच्छता वैयक्तिक संरक्षण वस्तूंचा उपयोग ज्यामध्ये जलरोधक एपरण, गॉगल्स, मास्क आणि हातमोजांचा समावेश होतो, केला पाहिजे.
- मृतदेहावरील सर्व नळ्या कॅथेटर्स, ट्यूब काढून टाकल्या पाहिजेत
- ट्यूब कॅथेटर नळ्या काढताना तयार झालेली छिद्रे ही निर्जंतुकीकरण द्रावणाचा वापर करून स्वच्छ केली पाहिजेत, ज्यामध्ये 1% हायपोक्लोराईट असेल आणि त्यांना प्लास्टिक सारख्या आवरणाने झाकले पाहिजे
- कॅथेटर आणि त्यासारखी इतर अनुकुचीदार साधने स्वतंत्र डब्यात साठवली पाहिजेत
- मृतदेहाचे नाक, तोंड यांसारखे अवयव शरीरातील द्रव बाहेर येऊ नयेत यासाठी व्यवस्थित बंद केले पाहिजेत
- पेशंटच्या कुटुंबीयांना विलगीकरण कक्षाच्या बाहेर जाण्याअगोदर मृतदेहाला शेवटी बघण्याची इच्छा असेल तर त्यांना मानक प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर तशी परवानगी देण्यात यावी
- झिरपणार नाही अशा प्लास्टिक पिशवीत मृतदेह ठेवला जावा त्या पिशवीला बाहेरून 1% हायपोक्लोराईटने पुसून घ्यावे नंतर तो मृतदेहाच्या आवरणात किंवा कुटुंबीयांनी दिलेल्या आवरणात लपेटण्यात यावा
- त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात द्यावा किंवा शवागारात नेला जावा
- वापरण्यात आलेल्या कपड्यांच्या विल्हेवाटीसाठी मानक प्रक्रियेचा अवलंब केला जावा त्यांना जैव संवेदनशील कचऱ्यात एकत्र करून त्या पिशवीचा बाहेरचा भाग हायपोक्लोराईट वापरून स्वच्छ केला जावा
- वापरलेले उपकरणे यांचे प्रस्थापित संसर्ग नियंत्रण पद्धती वापरून निर्जंतुकीकरण केले जावे
- सर्व वैद्यकीय कचरा जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांतर्गत हाताळून त्यांची विल्हेवाट लावली जावी
- मृतदेहाची हाताळणी केलेला कर्मचारीवर्ग वैयक्तिक संरक्षक आच्छादने काढून स्वतःची पूर्ण स्वच्छता करेल.
- मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले जावे आणि त्यांच्या भावनांचा आदर राखला जावा
परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण
विलगीकरण कक्षातील सर्व पृष्ठभाग जसे फरशी, बिछाना, पकडण्याचे साईड बार टेबल सोडियम हायपोक्लोराईट वापरून साफ केले जावेत हे द्राव तीस मिनिटे ठेवले जावेत आणि त्यानंतर वाळू द्यावेत
शवागारातील मृतदेहाची हाताळणी
- कोविड-19 पेशंट्स मृतदेह हाताळणाऱ्या शवागारातील कर्मचाऱ्यांनी मानक प्रणालीतील नमूद केलेली काळजी घ्यावी
- 4 डिग्री सेल्सियस तापमानात मृतदेह ठेवले जावेत
- शवागार स्वच्छ ठेवले जावे आजूबाजूचे पृष्ठभाग उपकरणे मृतदेह हलवण्याच्या ट्रॉली या सर्व 1% सोडियम हायपोक्लोराईट असलेल्या द्रावणाने निर्जंतुकीकरण केल्या जाव्यात
- मृतदेह हलवल्यानंतर चेंबरचा, दरवाजा, हँडल, फरशी ही 1% सोडियम क्लोराइड द्रावणाने पुसून घेतली जावी
मृतदेहाचे विलेपण
मृतदेह जतन करण्याची परवानगी दिली जाऊ नये
Covid-19 पेशंटच्या मृतदेहांचे शवविच्छेदन
शवविच्छेदन टाळले जावे. काही विशेष कारणाने शवविच्छेदन करावे लागल्यास खालील काळजी घेण्यात यावी
- शवविच्छेदन करणारी डॉक्टरांची टीम संसर्ग प्रसार नियंत्रण प्रणालीमध्ये अनुभवी असावी
- शवविच्छेदन खोलीमध्ये फॉरेन्सिक तज्ञ आणि इतर सहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असावी
- शवविच्छेदन करणारी टीम ही वैयक्तिक संरक्षण साधने वापरत असावी
- गोलाकार टोके असलेल्या कात्र्यांचा वापर व्हावा
- जखमांची तीव्रता कमी करण्यासाठी पीएम 40 किंवा इतर धारदार ब्लेडचा वापर केला जावा
- एकावेळी शरीराचा एकच भाग याचे विच्छेदन केले जावे
- शरीराचे अस्थिर भाग टेबलवर घट्टपणे पकडले जावेत व यासाठी स्पंजचा वापर केला जावा हाताची पूर्ण काळजी घेतली जावी
- शवविच्छेदन ग्रहात निगेटिव्ह दबाव बनवून ठेवला जावा हाडांमधील एरोसोल काढण्यासाठी ऑसीलेटर यांत्रिक करवतीचा वापर करण्यात यावा इतर ठिकाणी चेन वर आधारित हातात पकडण्यात येणार्या करवतीचा वापर करण्यात यावा
- सुया आणि सिरींज या धारदार वस्तू साठीच्या बकेटमध्ये टाकल्या जाव्यात
- एरोसोल ची निर्मिती नियंत्रित करण्यासाठी योग्य तंत्रे वापरली जावीत
- फुफ्फुसांच्या ऊतींचे हाताळणी करत असताना विशेष काळजी घेतली जावी
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूर्ण शरीर 1% सोडियम हायड्रोक्लोराइड असलेल्या द्रावणाने पुसून घेतले जावे आणि एका पिशवीत ठेवले जावे त्या पिशवीचे बाह्य आवरण पुन्हा 1% सोडियम क्लोराइड रावणाने पुसून घेतले जावे
- त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना दिला जावा
- शवविच्छेदनाच्या टेबल मानक प्रणालीनुसार स्वच्छ केले जावे
वाहतूक
- एका पिशवीत ठेवलेला मृतदेह ज्याचे बाह्य आवरण याचे निर्जंतुकीकरण केले गेले आहे यामुळे वाहतूक करणाऱ्या कर्मचारी वर्गाला संसर्गाचा धोका नसतो
- मृतदेहाची हाताळणी करणारा कर्मचारी वर्ग मानक प्रणालीची अंमलबजावणी करेल
- मृतदेहाचे दफन किंवा दहन भूमीमध्ये हस्तांतरण झाल्यानंतर वाहतूक करणारे वाहन हे 1% सोडियम क्लोराइडच्या द्रावणाने साफ केले जावे
दहन किंवा दफन भूमी
- Covid-19 मुळे काही अतिरिक्त धोका नाही याबाबतीत दहन किंवा दफन भूमितील कर्मचार्यांचे समुपदेशन केले जावे
- तेथील कर्मचारी हा स्वच्छता मास्क हातमोजे यांचा वापर आदी बाबतीत मानक प्रणालींचा अवलंब करेल
- मृतदेहाच्या पिशवीचा चेहऱ्याकडील भाग उघडा करून कुटुंबीयांना शेवटी एकदा मृतदेह पाहण्याची परवानगी देण्यात यावी
- अंत्यसंस्कार विधी जसे की पवित्र पुस्तकांचे वाचन पवित्र पाण्याचा शिडकावा किंवा तत्सम इतरही ज्यामध्ये मृतदेहाला स्पर्श करावा लागत नाही असे विधी करण्यात काही हरकत नाही
- मृतदेहाला आंघोळ घालणे, चुंबन घेणे किंवा मिठी मारणे आधी प्रकारांची परवानगी दिली जाऊ नये
- दफन दहनभूमीवर कर्मचारी कुटुंबीय हे हातांची स्वच्छता करतील
- मृतदेहाच्या राखेमुळे कुठलाही धोका नसतो आणि ती अंत्यविधीसाठी एकत्र केली जाऊ शकते
- दहन किंवा दफन भूमीमध्ये गर्दी टाळावी यामुळे सामाजिक अंतर राखणे शक्य होईल आणि कुटुंबियांपासून इतरांना अंतर राखणे शक्य होईल.
इंग्रजी माहितीकरीता येथे क्लिक करा
(Release ID: 1608523)
अभ्यागत कक्ष : 495