वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पेट्रोलियम, स्फोटके, ऑक्सिजन आणि औद्योगिक वायू उत्पादकांना येणाऱ्या अडचणी बद्दल पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटनांव्दारे (PESO) करण्यात येणाऱ्या उपाययोजना

Posted On: 27 MAR 2020 2:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मार्च 2020

 

देशभर कोविड-19  महामारीचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन मध्ये रुग्णालयांना तसंच इतर आरोग्य सुविधांना वैद्यकीय  ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा सुरू राहावा आणि पेट्रोलियम, स्फोटके आणि औद्योगिक गॅस उत्पादक यांना येणाऱ्या अडचणींबाबत उद्योग व व्यापार विभाग तसेच वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटनांनी ( PESO)    केलेल्या विविध उपाययोजना केल्या आहेत.

 

यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

1.  औषधोपचारांसाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजनचा साठा आणि वाहतूक यांच्यासाठीचे परवाने विनाविलंब देण्याबाबत खात्री करून घेण्याच्या सूचना PESO मुख्यालयाने आपल्या सर्व कार्यालयांना दिल्या आहेत

2 Covid-19 उद्रेक होऊ नये यासाठी देशभर घेत असलेल्या सुरक्षा उपायांच्या दरम्यान मेडिकल ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साईड याचा पुरवठा आणि उत्पादन व्यवस्थित तसेच MHA order no 40-3/2020 या 24/03/2020 च्या आदेशानुसार व्हावे यासाठीचे निर्देश PESO ने 25/03/2020 रोजी सर्व राज्यांचे मुख्य सचिव (गृह) यांना जारी केले आहेत.

3 ऑक्सिजन  तसंच इतर उपयुक्त वायूंच्या पुरवठ्यासाठीचे जे परवाने 31/03/2020 ला संपुष्टात येणार आहेत त्यांना 30/06/2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

4  स्फोटके आणि फटाके यांचा साठा, वाहतूक, विक्री, उपयोग आणि उत्पादन यासाठीच्या ज्यांच्या परवान्यांची मुदत 31/03/2020 ला  संपुष्टात येत आहे त्यांना ही मुदत 30/09/2020 पर्यंत वाढवून देण्यात येत आहे.  परवान्याच्या  नूतनीकरणासाठीचे विलंब शुल्कही घेतले जाणार नाही.

5 कॉम्प्रेस्ड ऑक्सिजन, सीएनजी, एलपीजी आणि इतर वायूवर आधारीत बाबी वैधानिक हायड्रो परीक्षणासाठी 31/03/2020 पर्यंत उपलब्ध असायला हव्यात.  त्यां च्यासाठीची ही मुदत 30/06/2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

6.  ऑक्सिजनचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी प्रेशर वेसल्सचे सेफ्टी व्हाल्व्स आणि इतर साधने वैधानिक परीक्षणासाठी 15/03/2020 ते 30/06/2020या मुदतीत उपलब्ध असायला हवी  ती 30/06/2020 या दिवशी परीक्षणासाठी उपलब्ध करायला परवानगी आहे.

 

G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor


(Release ID: 1608500) Visitor Counter : 216


Read this release in: English