संरक्षण मंत्रालय

लॉकडाउनचा पहिला दिवस: इराणहून आणलेल्या 277 जणांची लष्कराकडून जोधपुर इथे व्यवस्था, मुख्यालयातल्या कर्मचाऱ्याना घरून काम करण्याचे आदेश

Posted On: 25 MAR 2020 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मार्च 2020

21 दिवसांच्या लॉक डाऊनच्या पहिल्या दिवशी, इराणमधे अडकलेल्या आणि भारतात आणलेल्या 277 जणांची जोधपुर इथल्या आर्मी फॅसिलिटीमधे  व्यवस्था करण्यात आली. यामध्ये 273 यात्रेकरू आहेत.149 महिला आणि 6 बालकांचा यात समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांना एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून  जोधपुर विमानतळावर पोहोचवण्यात आले.तिथे  त्यांचे थर्मल स्क्रीनिग करण्यात आले. त्यानंतर या सर्वाना वैद्यकीय तळावर नेण्यात आले. इथे   विलगीकरणा बरोबरच क्रीडा आणि मनोरंजन सुविधाच्या माध्यमातून  मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य याचीही काळजी घेण्यात येते.

जागतिक लॉक डाऊन मुळे,कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले असून काम कमी करण्यात आले आहे,यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य, प्रशिक्षण कार्यक्रम यांचा समावेश आहे. महत्वाच्या नियुक्त्या आणि कार्यालयाचे 40 टक्के काम घरातून केले जात आहे. आरोग्य कर्मचारी, चालक,यासह अन्य सहाय्यक कर्मचारी यांचे  दैनंदिन कामकाज सुरु आहे.

            इराण,इटली  आणि मलेशिया मधे अडकलेल्या लोकांना आणल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी लष्कराने मानेसर, जैसलमेर आणि जोधपुर इथे वैद्यकीय तळ उभारला आहे. आवश्यक त्या सर्व  नियम आणि बाबींची पूर्तता झाल्यानंतर  वूहन आणि जपानमधून  सुटका केलेल्या डिस्चार्ज   देण्यात आला  आहे. सुटका करण्यात आलेल्या 1200 हून अधिक लोकांशिवाय वैद्यकीय कर्मचारी आणि वैमानिकानाही देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.यामध्ये आतापर्यंत एकजण कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

याशिवाय झाशी,बिन्नागुडी आणि गया इथेही वैद्यकीय सुविधा सज्ज असून  तिथे 1600  खतांची अतिरिक्त उपचाराची सोय आहे.

 

R.Tidke/N.Chitale/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1608422) Visitor Counter : 161


Read this release in: English