आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 संदर्भात सद्यस्थिती आणि त्यासंदर्भात उचलण्यात आलेल्या पाऊलांचा मंत्री गटाकडून आढावा
कोविड -19 चा मुकाबला करण्यासाठी, सोशल डीस्टन्सिग, घरी विलगीकरण यासंदर्भातले नियम आणि डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे महत्व डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडून अधोरेखित
Posted On:
25 MAR 2020 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2020
कोविड-19 संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत निर्माण भवन इथे आज उच्च स्तरीय मंत्री गटाची बैठक झाली.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि यासंदर्भातल्या व्यवस्थापनाबाबत या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. यासंदर्भात आतापर्यंत उचलण्यात आलेली पाऊले, कोविड-19 ला रोखण्यासाठीचा उपाय असलेल्या सोशल डीस्टन्सिंगबाबत सद्य स्थिती,कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी राज्यांनी उचललेली कठोर पावले या विषयी या बैठकीत चर्चा झाली. केवळ कोविड-19 च्या रुग्णासाठी रुग्णालये निर्माण करणे, वैद्यकीय संस्थाना पीपीईने सुसज करणे, व्हेंटीलेटरआणि इतर आवश्यक उपकरणांसाठी अतिरिक्त संसाधनाची आवश्यकता असणाऱ्या राज्यांची क्षमता दृढ करण्याबाबत विचार झाला. आवश्यक सेवा आणि पुरवठा सुरूच राहील याची राज्यांनी खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात आले. रुग्णालये, औषध दुकाने, औषध, लस, मास्क, वैद्यकीय उपकरणे निर्मिती करणारी आस्थापने यांचा यात समावेश आहे. गुजरात, आसाम, झारखंड, राजस्थान,गोवा,कर्नाटक,माध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांत, कोविड-19 साठीच्या रुग्णालयांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती मंत्री गटाला देण्यात आली. कोविड-19 च्या निदान चाचणीसाठी 118 प्रयोग शाळांचा आयसीएमआर च्या जाळ्यात समावेश करण्यात आला आहे. कॅबिनेट सचिवानी, मुख्य सचिव, आरोग्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांना केल्या आहेत. नं याबाबतही मंत्री गटाला माहिती देण्यात आली. कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय म्हणून सोशल डीस्टन्सिगचे अतिशय महत्व असल्याचे डॉक्टर हर्षवर्धन यांनी अधोरेखित केले.
घरी विलगीकरणाची सूचना करण्यात आलेल्या व्यक्तींनी, यासंदर्भातले नियमांचे पालन करावे या आवाहनाचा पुनरुच्चार त्यांनी केला.आरोग्य मंत्रालयाच्या संकेत स्थळावर हे नियम उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी संपूर्ण देशात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. या काळात आपल्या घरातही सोशल डीस्टन्सिग राखण्याची खातरजमा आपण करण्याची गरज असल्याचे हर्ष वर्धन यांनी सांगितले. 21 मार्च 2020 पासून आतापर्यंत सुमारे 64,000 व्यक्ती इतर देशातून भारतात आल्या आहेत,त्यापैकी 8000 लोकांना वेगवेगळ्या क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे. 56,000 लोकाना घरातच वेगळे ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. आपण एका संसर्गजन्य रोगाशी लढा देत आहोत, स्वतःचे आणि इतरांचेही संरक्षण करण्यासाठी, सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे अतिशय महत्वाचे असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. या निर्देशांचे पालन केले नाही तर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विषयक या आपत्कालीन परिस्थितीत सर्वात पुढे राहून आपले नेतृत्व करणारे आणि कोविड-19 पासून वाचवण्यासाठी आपली बहुमुल्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्याना,लोकांनी बहिष्कृत करू नये या आवाहनाचा पुनरुच्चार त्यांनी केला. अफवा तसेच अधिकृत नसलेली माहिती पसरवू नये असे आवाहनही त्यांनी केले.
नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी,परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, यांच्यासह अन्य मंत्री आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रीती सूदन यांच्यासह अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
G.Chippalkatti /N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1608362)
Visitor Counter : 127