संरक्षण मंत्रालय
कोविड -19 च्या विलगीकरण कक्षांसाठी आयुध निर्माण मंडळाने राखून ठेवल्या 285 खाटा
Posted On:
25 MAR 2020 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2020
कोरोना विषाणू (कोविड -19) बाबतची प्रकरणे हाताळण्यासाठी विलगीकरण कक्षांकरित OFB म्हणजेच आयुध निर्माण मंडळाने 285 खाटा राखून ठेवल्या आहेत. जबलपूरच्या वाहन निर्माण कारखान्यात 40 खाटा, तर इशापूरचा धातू आणि पोलाद कारखाना, कासीपूरचा बंदूक आणि कवच कारखाना, खडकीचा दारुगोळा कारखाना, तसेच कानपूर, खमरिया आणि अंबाझरीचे आयुध निर्मिती कारखाने या 6 ठिकाणी प्रत्येकी 30 खाटा, अंबरनाथच्या आयुध निर्मिती कारखान्यात 25 खाटा आणि अवधीच्या अवजड वाहन कारखान्यात तसेच मेदकच्या आयुध निर्मिती कारखान्यात प्रत्येकी 20 खाटा, असे त्या खाटांचे वितरण असेल.
काल झालेल्या कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार, OFB च्या अध्यक्षांनी, OFB च्या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष आणि संबंधित खाटांची संख्या यांची व्यवस्था लावली आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या HLL लाइफ केअर लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या मागणीनुसार, चेहऱ्याचे मास्क आणि व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे तयार करण्याचाही प्रयत्न आयुध निर्मिती मंडळ करीत आहे.
B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar
(Release ID: 1608347)
Visitor Counter : 219