वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

मालाची वाहतूक आणि वितरण, आणि अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी डीपीआयआयटी ने नियंत्रण कक्षाची स्थापना केली

Posted On: 26 MAR 2020 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मार्च 2020

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत, व्यापार प्रोत्साहन विभागाने, 25 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 या लॉकडाऊनच्या कालावधीत मालाची वाहतूक आणि वितरण, उत्पादन तसेच सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची स्थिती आणि वास्तविक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि विविध हितसंबंधीयांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून एका नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. कोणत्याही उत्पादनात, वाहतूकदाराला, वितरकाला, घाऊक विक्रेत्याला किंवा ई-वाणिज्य कंपन्यांना मालाची वाहतूक आणि वितरण करताना किंवा संसाधनांची जमवाजमव करताना कोणतीही अडचण येत असल्यास त्यांनी त्याची माहिती विभागाला खालील दूरध्वनी क्रमांकावर/इमेल द्वारे द्यावी:-

दूरध्वनी क्रमांक: + 91  11 23062487

इमेल : controlroom-dpiit[at]gov[dot]in

दूरध्वनी क्रमांक सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत कार्यरत असतील. विविध लाभधारकांनी नोंदविलेले मुद्दे संबंधित राज्य सरकार, जिल्हा आणि पोलीस अधिकारी आणि इतर संबंधित संस्थांकडे हे मुद्दे वर्ग केले जातील.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar



(Release ID: 1608323) Visitor Counter : 189


Read this release in: English