नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
लॉकडाऊनमुळे अक्षय ऊर्जा प्रकल्पाना मुदतवाढ मिळणार
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2020 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2020
एमएनआरई (नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय) चे सचिव श्री आनंद कुमार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की लॉकडाऊन कालावधी व कार्यशक्तीच्या पुनर्वसनासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन अंमलबजावणी होत असलेल्या सर्व अक्षय ऊर्जा प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात येईल.
पंतप्रधानांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आणि कोरोनाव्हायरसची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कोरोनाव्हायरसच्या प्रसारामुळे आरई (Renewable Energy) प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणारया घटकांची पुरवठा साखळीच खंडित झाली नाही तर कामगारांच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. या संदर्भात वेळ वाढविण्याच्या घोषणेमुळे आरई (renewable energy) क्षेत्रातील सर्व भागधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
G.Chippalkatti /R.Tidke/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1608298)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English