पंतप्रधान कार्यालय

देशभरामध्ये आज साज-या होत असलेल्या विविध सणांनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा


सद्यपरिस्थितीला तोंड देण्यासाठी हे सण आपला संकल्प दृढ करण्यासाठी मदत करतील - पंतप्रधान

Posted On: 25 MAR 2020 11:55AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 मार्च 2020

 

देशभर आज साजरे होत असलेल्या विविध सणांनिमित्त देशातल्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

व्टिटरच्या माध्यमातून एका शृंखला संदेशाव्दारे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ‘‘आपण सर्वजण आपल्या पारंपरिक दैनंदिनी, पंचांगानुसार भारतामध्ये विविध सण-उत्सव साजरे करीत आहोत आणि आज नववर्षाचा प्रारंभही होत आहे. उगाडी, गुढी पाडवा, नवरेह आणि साजिबू चेराओबा यानिमित्त सर्वांना माझ्या शुभेच्छा ! या शुभप्रसंगी आपल्या सर्वांना जीवनामध्ये उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभावी.

आपला देश कोविड-19 च्या संकटाशी सामना करीत असताना आपण हे सण  साजरे करीत आहोत. सर्वसामान्यपणे आपण ज्या उत्साहात सण साजरे करतो, तसा उत्साह यंदा असणार नाही. मात्र सद्यपरिस्थितीशी दोन हात करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करण्याचं काम हे सण करतील. कोविड-19 शी लढा देण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया !!’’ असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

सभी देशवासियों को नववर्ष विक्रम संवत 2077 की हार्दिक शुभकामनाएं। यह नववर्ष आप सबके जीवन में समृद्धि और उत्तम स्वास्थ्य लेकर आए।

— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2020

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1608233) Visitor Counter : 98


Read this release in: English