पंतप्रधान कार्यालय

कोरोनाविषाणूच्या मध्यवर्ती संकल्पनेवरच्या गीतांसाठी पंतप्रधानांकडून गायकांची प्रशंसा


पंतप्रधानांच्या ‘जनता कर्फ्यूच्या’ संदेशाचा प्रसार केल्याबद्दल त्यांच्याकडून नामवंतांचे कौतुक

Posted On: 22 MAR 2020 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मार्च 2020

 

कोरोना विषाणूवरील मध्यवर्ती संकल्पना मांडणाऱ्या गीतांबद्दल पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी मालिनी अवस्थी आणि प्रीतम भरतवान यांची प्रशंसा केली आहे. पंतप्रधानांनी ट्विटरवर ती गीते शेअर करताना म्हटले आहे की- जनता कर्फ्यू को लेकर हर कोई अपनी-अपनी तरह से योगदान देने में जुटा है। लोक गायिका @maliniawasthi जी अपने अंदाज में लोगों को प्रेरित कर रही हैं... #JantaCurfew, जनता कर्फ्यू को लेकर लोक गायक प्रीतम भरतवाण जी ने एक अनोखा और बेहद सुरीला संदेश दिया है... #JantaCurfew.

प्रसारमाध्यमांनी उचित माहितीचे प्रसारण केल्याबद्दल तसेच योग्य ती खबरदारी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविल्याबद्दलही त्यांनी माध्यमांचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यू चा संदेश व्यवथितपणे पसरविण्याबद्दल त्यांनी प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्तींचीही प्रशंसा केली आहे. ट्विटर संदेशांचा मालिकेत पंतप्रधानांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी,  'रविवार घरीच व्यतीत करण्याच्या' संकल्पनेला, प्रसिद्ध व्यक्ती प्रोत्साहन देत आहेत आणि जनतेचाही त्याला भरघोस पाठिंबा मिळत आहे.

आजच्या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन करत, याने कोविड -19 संकटाविरुद्धच्या लढाईला प्रचंड बळ मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी  व्यक्त केला आहे. या काळात सामाजिक ठिकाणी व्यक्ती-व्यक्तींमध्ये अंतर राखण्यावर भर देत, पंतप्रधानांनी जनतेला दर्जेदार पद्धतीने कुटुंबाबरोबर आपला वेळ व्यतीत करण्यास सुचविले आहे. यामध्ये दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचा आनंद घेण्याचा तसेच उत्तमोत्तम अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. कोविड -19 विरुद्धच्या लढाईत आपल्यापैकी प्रत्येकजण एक मौल्यवान सैनिक असून, आपण सावध व दक्ष राहण्याने लाखो आयुष्ये वाचण्यास मदत होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  "रस्ते रिकामे असले तरी, कोविड -19 शी लढण्याचा निर्धार मात्र मनामनात पूर्ण भरलेला आहे" असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1607817) Visitor Counter : 126


Read this release in: English