पंतप्रधान कार्यालय

संपूर्ण बंदचे काटेकोर पालन करण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन

प्रविष्टि तिथि: 23 MAR 2020 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2020

 

जनता देशातील लॉकडाऊनकडे गांभीर्याने बघत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांकडून मिळत असलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून जनतेने आपल्या कुटुंबियांचे आणि स्वतःचे रक्षण करावे’, असे आवाहन मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे केले आहे.

लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यास जनतेला भाग पाडावे’, अशी विनंती त्यांनी राज्य सरकारांना केली आहे.

 

 

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar


(रिलीज़ आईडी: 1607745) आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English