उपराष्ट्रपती कार्यालय

उद्याच्या रविवारी घरी राहून स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या - उपराष्ट्रपती


कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इतरांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन द्यावे

राजकीय पक्ष आणि अन्य सर्वांनी कोरोना विषाणूचा एकत्रितपणे सामना करण्याचे नायडूंचे आवाहन

Posted On: 21 MAR 2020 4:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मार्च 2020

 

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्‍यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी देशातील जनतेला उद्या (22 मार्च, 2020 रोजी) घरातच राहण्‍याचे आवाहन केले आहे; जेणेकरुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रभावीपणे रोखता येईल. प्रत्‍यक्ष संपर्काद्वारे विषाणूचा प्रसार होत असल्‍यामुळे, विषाणूच्या 'इक्युबेशन' कालावधीत संपर्क टाळून त्‍याचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर (सोशल डिस्टंसिंग) राखणे, हा एक प्रभावी उपाय आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यू' पाळण्याचे केलेले आवाहन म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतराच्या माध्यमातून ‘स्वतःची आणि इतरांची काळजी घेणं' आणि वैद्यकीय तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेने देखील याचे तत्वतः समर्थन केल्याचे नायडूंनी स्पष्ट केलं.

नायडू यांनी राजकीय पक्ष, नागरी संस्था आणि इतर सर्व संबंधिताना कोरोना विषाणूमुळे देशासमोर उभे ठाकलेल्या आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, आव्हानाचा सामना करण्यासाठी इतरांना शिक्षित करणे आणि प्रोत्साहित करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

 

S.Pophale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1607495) Visitor Counter : 121


Read this release in: English