आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना विषाणू लसीवरील संशोधन
Posted On:
20 MAR 2020 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2020
जागतिक आरोग्य सुरक्षेविषयीच्या 2019च्या सरासरी निर्देशांकानुसार, भारताची वर्गवारी “अधिक सज्ज” अशा गटात करण्यात आली आहे. 30 जानेवारी 2019 ला जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या शिफारसीच्या आधारावर, नवीन कोरोनाविषाणु (COVID-19) चा उद्रेक सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणीबाणी आहे, असे WHO च्या महासंचालकांनी जाहीर केले. त्यानुसार, 11 आणि 12 फेब्रुवारी 2020 ला जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञ कोरोनावर संशोधन करण्यासाठी जिनेव्हा येथे एकत्र आले. या विषाणुवर तातडीने संशोधन करण्याची गरज असून त्यासाठी एकत्र येऊन काम करणे आणि भविष्यातील संकटांशी सामना करण्यासाठी सिध्द राहणे, यावर या बैठकीत चर्चा झाली.
रुग्णांना औषधांचा पुरेसा पुरवठा होईल, याची पूर्ण काळजी सरकार घेत आहे.
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी, विशेषतः सर्व प्रकारचे मास्क आणि सैनीटायझरची कमतरता असल्याचे जाणवल्यानंतर सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढून या दोन्ही वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तू-सेवा कायदा, 1955 अंतर्गत केला गेला. 30 जून 2020 पर्यंत ह्या दोन्ही वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला जाईल.
या कायद्याअंतर्गत, उत्पादकांशी चर्चा केल्यानंतर, राज्य सरकार त्यांना उत्पादन वाढवण्यास सांगू शकते. तसेच, या दोन्ही वस्तूंच्या किमतीही स्थिर राखल्या जातील याचीही काळजी राज्य सरकार घेऊ शकेल.
या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरोधात राज्य सरकार कारवाई कार्य शकणार असुन, या वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केल्यामुळे, राज्य सरकारांना कठोर कारवाई करणे सोपे जाणार आहे.
या आजारासंदर्भात जारी करण्यात आलेल्या सर्व हेल्पलाईन्सना योग्य प्रसिद्धी द्यावी, असेही केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितले आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1607407)
Visitor Counter : 153