सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
प्रधानमंत्र्यांचा रोजगार निर्मिती कार्यक्रम-वर्ष 2019-20 मध्ये 79236 लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यास आर्थिक मदत देणार
प्रविष्टि तिथि:
19 MAR 2020 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2020
देशातील पारंपारिक कारागीर आणि बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यासाठी मदत होण्याच्या हेतूने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत वर्ष 2019-20 मध्ये 79,236 लाभार्थ्यांना त्यांचे छोटे उद्योग उभारण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारने 15 मार्चपर्यंत 54,361 लाभार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी मदत केली आहे.
अकृषक क्षेत्रात सूक्ष्म उद्योगांच्या निर्मितीतून स्वयंरोजगार निर्माणाला चालना देण्याच्या हेतूने हा कर्जावर सवलत देणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यमान आर्थिक वर्षासाठी सरकारने 2396 कोटी 44 लाख रुपयांच्या अनुदान वितरणाचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. या आर्थिक वर्षात 15 मार्चपर्यंत त्यापैकी सुमारे 1622 कोटी 50 लाख रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत, लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून देशभरातील लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षात वितरीत झालेले अनुदान आणि या वर्षी विविध राज्यांमधील नवे प्रकल्प तसेच जुन्या प्रकल्पांना व्यवसाय वृद्धीसाठी वितरीत होणाऱ्या अनुदानासाठी ठरविलेल्या लक्ष्याच्या आकडेवारीची माहिती आज गडकरी यांनी लोकसभा सदस्यांना दिली.
B.Gokhale/S.Chitnis/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1607201)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English