गृह मंत्रालय
राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना निमलष्करी दलात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने उचलली महत्त्वाची पावले
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातल्या आगामी उप निरीक्षक आणि हवालदार पदांसाठीच्या थेट भरती परीक्षा देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना देणार बोनस गुण
राज्यांमधील पोलीस दलांची थेट भरती परीक्षा देण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना सर्व राज्य सरकारांनी प्रोत्साहन द्यावे अशा केंद्र सरकारच्या सूचना
Posted On:
19 MAR 2020 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2020
राष्ट्रीय छात्र सेनेत देशातील अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मनोदयाची पूर्ती करण्याच्या हेतूने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातल्या थेट भरती परीक्षा देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना बोनस गुण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय छात्र सेनेचे “अ” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 टक्के बोनस गुण,”ब” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 टक्के बोनस गुण तर “क” प्रमाणपत्र धारकांना 5 टक्के बोनस गुण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या योजनेचा फायदा उप निरीक्षक आणि हवालदार पदांसाठी लवकरच होणार असलेल्या थेट भरती परीक्षा देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना होणार आहे. सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या संबधित पोलीस दलांच्या प्रवेश परीक्षांमध्ये अशाच प्रकारच्या प्रोत्साहक योजना राबवाव्या अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे देशातील अधिकाधिक युवकांना राष्ट्रीय छात्र सेनेत दाखल होण्यासाठी स्फूर्तीदायक वातावरण तयार होईल. त्याचबरोबर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भारती होण्यासाठी उत्तमरीत्या प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध तरुण अधिक प्रमाणात उपलब्ध होतील.
B.Gokhale/S.Chitnis/P.Kor
(Release ID: 1607123)
Visitor Counter : 137