विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

हिमालय जैवसंपदा तंत्रज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले नवे स्वच्छता द्रावण (सॅनिटायझर)


या सॅनिटायझरमध्ये वापरलेले नैसर्गिक सुगंध, चहामधील सक्रीय घटक आणि अल्कोहोलचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून

पॅराबेन, ट्रायक्लोसॅन, कृत्रिम सुगंध आणि थॅलेट यासारख्या रासायनिक पदार्थांचा वापर या उत्पादनात केलेला नाही.

Posted On: 18 MAR 2020 2:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सॅनिटायझरची मागणी वाढत आहे आणि अशात भेसळयुक्त जंतुनाशकांची बाजारात विक्री होत असल्याचे प्रकारही वाढत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या हिमाचल प्रदेशातील पालमपूर इथल्या IHBT अर्थात हिमालय जैवसंपदा तंत्रज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नवे जंतुनाशक विकसित केले आहे.

संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार यांनी सांगितले की, या जंतुनाशकात वापरलेले नैसर्गिक गंध, चहामधील सक्रीय घटक आणि अल्कोहोलचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून आहेत. या उत्पादनाचे विशेष म्हणजे यात पॅराबेन, ट्रायक्लोसॅन, कृत्रिम गंध आणि थॅलेट यासारख्या रासायनिक पदार्थांचा वापर या उत्पादनात केलेला नाही.

या जंतुनाशकाच्या व्यावसायिक स्तरावरील उत्पादनासाठी शास्त्रज्ञांनी वापरलेले तंत्रज्ञान पालमपूरच्या ए. बी. सायंटिफिक सोल्युशन्स या कंपनीला देण्यात आले आहे. यासंदर्भात सदर कंपनी आणि हिमालय जैवसंपदा तंत्रज्ञान संस्था करार करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात विस्तारलेली ही कंपनी नव्या जंतुनाशकाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी पालमपूर इथे स्वतंत्र प्रकल्प उभारणार आहे. तसेच या जंतुनाशकाच्या बाजारातील वितरणाची जबाबदारी देखील या कंपनीवर असेल.

डॉ. संजय कुमार म्हणाले की, बाजारात सॅनिटायझरच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली असताना आणि त्याच्या किमती वाढत असताना हे नवे सॅनिटायझर अत्यंत योग्य वेळी विकसित झाले आहे.

 

S.Pophale/S.Chitnis/P.Kor


(Release ID: 1606874) Visitor Counter : 166


Read this release in: English