गृह मंत्रालय
1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2019 या काळात परदेशी नागरिकांना 26,786 दीर्घकालीन व्हिसा प्रदान; यात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या 25,782 अल्पसंख्याक नागरिकांचाही समावेश: नित्यानंद राय
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2020 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2020
बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून भारतात अधिकृत प्रवासी कागदपत्र घेऊन येणाऱ्या आणि भारताचे नागरिकत्व मिळवू इच्छिणाऱ्या खालील श्रेणीतल्या व्यक्तींना दीर्घकालीन व्हिसा दिला आहे अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत दिली. या तीन देशातल्या अल्पसंख्याक नागरिकांना दिलेल्या व्हिसा संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे लेखी उत्तर दिले.
- बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन.
- बांगलादेश/पाकिस्तान मधल्या ज्या महिलांनी भारतीय नागरिकांशी विवाह केला असून ते भारतात राहत आहेत किंवा अफगाणिस्तानच्या नागरिकांनी भारतीय नागरिकाशी विवाह केला असून ते भारतात राहत आहेत अशा व्यक्ती.
- भारतीय वंशाच्या महिला ज्यांनी बांगलादेश, अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानच्या नागरिकांशी विवाह केला मात्र त्यांना वैधव्य आले असल्यास अथवा घटस्फोटीत असल्यास तसेच त्यांना आधार देणारी कोणीही व्यक्ती नसेल तर
- अशी काही प्रकरणे जिथे करुणामय मानवतावादी दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे.
1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2019 या काळात आलेल्या अशा 26,786 परदेशी नागरिकांना दीर्घकालीन व्हिसा देण्यात आले आहेत. त्यापैकी 25,782 लोक बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशातले अल्पसंख्याक आहेत. श्रीलंकेतून आलेल्या नागरिकांना असा दीर्घकालीन व्हिसा देण्याची विशिष्ट तरतूद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना सरकारने विविध सुविधा दिल्या आहेत असेही ते म्हणाले.
सुधारित नागरिकत्व कायदा 2019 अन्वये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून 31 डिसेंबर 2014 किंवा त्यापूर्वी आलेल्या मुस्लीमेतर अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व मिळू शकेल असेही ते म्हणाले.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1606760)
आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English