जलशक्ती मंत्रालय
दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्प
प्रविष्टि तिथि:
16 MAR 2020 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2020
विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील इतर दुष्काळग्रस्त भागातील 8 मोठे/मध्यम सिंचन प्रकल्प आणि 83 भूस्तर लघू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात आले आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र सरकारला 2018-19 मध्ये 500 कोटी रुपयांचे आणि 2019-20 या वर्षात आतापर्यंत 300 कोटी रुपयांचे केंद्रीय साहाय्य देण्यात आले आहे. 2018-19 या वर्षात या प्रकल्पांच्या माध्यमातून 15,435 हेक्टर क्षेत्र सक्षम करण्यात आले असून नऊ भूस्तर लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.
जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1606606)
आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English