वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
फेब्रुवारी 2020 मधील घाऊक किंमत निर्देशांकात घट,122 वर स्थिरावला
Posted On:
16 MAR 2020 5:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2020
सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक किंमत निर्देशांकात फेब्रुवारी 2020 मध्ये 0.6 टक्के घट होऊन तो 122.2 झाला. या आधीच्या महिन्यात तो 122.9 होता.
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर फेब्रुवारी 2020 मध्ये 2.26 टक्के राहिला. त्या आधीच्या महिन्यात तो 3.1 टक्के आणि गेल्या वर्षी याच कालावधीत 2.93 टक्के होता.
प्राथमिक वस्तू
या गटाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 2.8 टक्के घट होऊन तो 143.1 झाला. अन्नधान्य घटकाच्या निर्देशांकात 3.7 टक्के घट होऊन तो 154.9 झाला. फळे व भाज्या (14 टक्के), चहा (8 टक्के), अंडी व मका (प्रत्येकी 7 टक्के), वेलची व मसाले आणि बाजरी (प्रत्येकी 14 टक्के), हरभरा व ज्वारी (प्रत्येकी 2 टक्के) आणि गोड्या पाण्यातले मासे, डुकराचे मांस, नाचणी, गहू, उडीद व मसूर (प्रत्येकी 1 टक्के) यांच्या किंमतीत घट झाली. मात्र गोमांस व बैलाचे मांस, सागरी मासे (प्रत्येकी 5 टक्के), विड्याची पाने (4 टक्के), मूग व पोल्ट्री चिकन (प्रत्येकी 3 टक्के), मटण (2 टक्के) आणि बार्ली, राजमा व तूर (प्रत्येकी 1 टक्के) यांच्या किंमतीत वाढ झाली.
अखाद्य घटकांच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.4 टक्के घट होऊन तो 131.6 झाला.
खनिजे घटकाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 3.5 टक्के वाढ होऊन तो 147.6 झाला.
कच्चे तेल व नैसर्गिक वायू घटकाच्या निर्देशांकात 1.5 टक्के घट होऊन तो 87.0 झाला.
इंधन व वीज
या गटाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 1.2 टक्के वाढ होऊन तो 13.9 झाला.
खनिज तेले घटकाच्या निर्देशांकात 1.2 टक्के घट झाली तर वीज घटकाच्या निर्देशांकात 7.2 टक्के वाढ झाली.
तयार उत्पादने
या गटाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के वाढ होऊन तो 118.7 झाला.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1606582)