पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमधील जोधपूर येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
14 MAR 2020 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2020
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जोधपुर येथे एका रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांप्रति दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे "राजस्थानमधील जोधपूर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघाताबद्दल ऐकून अतिशय दुःख झाले." त्यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती शोकभावना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी कामना केली.
D.Wankhede/S.Kane/D.Rane
(Release ID: 1606455)
अभ्यागत कक्ष : 86