गृह मंत्रालय

आयटीबीपीच्या छावला विलगीकरण शिबिरात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना सोडण्यास सुरुवात

Posted On: 13 MAR 2020 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2020

 

चीनमधल्या वुहान इथे अडकलेल्या 112 नागरिकांना 17 फेब्रुवारीला नवी दिल्लीत आणण्यात आल्यानंतर त्यांना आयटीबीपीच्या छावला विलगीकरण शिबिरात ठेवण्यात आले होते. या नागरिकांची पोहोचल्यानंतर आणि विलगीकरणाच्या कालावधीत 14 व्या दिवशी अशी दोन वेळा कोरोना विषाणूबाबतची चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण त्यांना झाली नसल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना आता घरी सोडण्यास सुरुवात होत आहे. यात 76 भारतीय आणि 36 परदेशी नागरिक आहेत.

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि आयटीबीपीचे महासंचालक एस.एस.देसवाल यांनी या नागरिकांची भेट घेतली.

विलगीकरणाच्या कालावधीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देण्यात आल्या तसेच वेळोवेळी त्यांची आवश्यक तपासणी करण्यात आली. आयटीबीपीच्या कार्याचे गृहराज्यमंत्र्यांनी कौतुक केले.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane



(Release ID: 1606374) Visitor Counter : 181


Read this release in: English