पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 मुळे निर्माण परिस्थितीवर सरकारचे पूर्ण लक्ष – पंतप्रधान


नागरिकांनी घाबरु नये मात्र अनावश्यक प्रवास टाळण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

केंद्रीय मंत्री सध्या परदेश प्रवास करणार नाहीत

Posted On: 12 MAR 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2020

 

नोवेल कोरोना विषाणू कोविड-19 मुळे निर्माण परिस्थितीवर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

सर्वांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय मंत्रालये आणि राज्यांनी विविध सक्रिय पावले उचलली असल्याचे पंतप्रधानांनी आज ट्विटरवरुन सांगितले.

घाबरुन न जाण्याचे आणि अनावश्यक प्रवास तसेच मोठ्या प्रमाणावरील सामूहिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे.

केंद्र सरकारमधील कोणीही मंत्री सध्या परदेश प्रवास करणार नसल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1606154) Visitor Counter : 90


Read this release in: English