खाण मंत्रालय

खनिज कायदे (सुधारणा) विधयेक, 2020 संसदेकडून मंजूर


भारतीय खाण क्षेत्राचे परिवर्तन घडवणारे विधेयक : प्रल्हाद जोशी

Posted On: 12 MAR 2020 6:25PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 12 मार्च 2020

 

खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायदा 1957 आणि कोळसा खाणी (विशेष तरतुदी) कायदा 2015 यातील सुधारणांसाठीचे खनिजे कायदा (सुधारणा) विधेयक 2020 संसदेने मंजूर केले आहे.

राज्यसभेने आज हे विधेयक मंजूर केले तर लोकसभेने यापूर्वीच 6 मार्च 2020ला हे विधेयक मंजूर केले आहे.

भारतीय कोळसा आणि खाण क्षेत्रात यामुळे नवे युग अवतरणार आहे; विशेषत: व्यवसाय सुलभतेला चालना मिळणार आहे, असे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. या विधेयकामुळे खाण क्षेत्रात परिवर्तन घडणार असून, देशातील कोळसा उत्पादनाला चालना मिळून आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane 


(Release ID: 1606141) Visitor Counter : 120


Read this release in: English