आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबत अद्ययावत माहिती


मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक

Posted On: 10 MAR 2020 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2020

 

कोविड-19च्या देशभरातील रुग्णांबाबत सद्यस्थिती, कृती, तयारी आणि व्यवस्थापन याबाबत आज आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सचिवांनी आज एक सर्व मंत्रालयांची / विभागांची एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

भारतात परत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरोग्याचे स्व-परीक्षण आणि हे करावे आणि हे करू नयेयाबाबत पालन करण्यासंदर्भात एक मार्गदर्शिका जारी  करुन सूचविण्यात आले. जगभरात आता 100 पेक्षा अधिक देशांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि या देशांमध्ये प्रवास करणारे किंवा परदेशी प्रवास करून आलेले, त्यांच्या निवासाच्या काळात किंवा विमानतळावर संक्रमण करताना कदाचित कोविड-19 च्या बाधित लोकांच्या संपर्कात आल्याच्या शक्यतेमुळे एक मार्गदर्शिका देण्यात आली.

या मार्गदर्शिकेद्वारे चीन, हाँगकाँग, कोरिया, जपान, इटली, थायलंड, सिंगापूर, इराण, मलेशिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी येथून आलेल्या प्रवाशांनी प्रवासाच्या दिवसापासून पुढे 14 दिवस आपणहून स्वतःला वेगळे ठेवावे आणि या काळात त्यांच्या कार्यालयांमधून त्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

11 मार्च 2020 पूर्वी प्रवास करणाऱ्यांना व्हिसावरील निर्बंध, पूर्वी जारी केलेल्या सूचनांव्यतिरिक्त, सर्व नियमित व्हिसा (ई-व्हिसासह) मार्गदर्शिका फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना देण्यात आले आहेत. जे परदेशी नागरिक अद्याप भारतात दाखल झालेले नाहीत, त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आजा आहे.

नियमित व्हिसा (ई-व्हिसासह) जो सर्व परदेशी राष्ट्रांमधील प्रवासासाठी देण्यात आला आहे, त्याचा प्रवासी इतिहास 1.2.2020 रोजी किंवा त्यानंतर जे भारतात परतलेले नाहीत त्यांचा देखील रद्द करण्यात आला आहे. सर्व परदेशी नागरिकांचा व्हिसा जे आत्ता भारतात आहेत, ते वैध आहेत. त्यांनी त्यांचा व्हिसा विस्तार किंवा रूपांतरण इत्यादिसाठी ई-एफआरआरओ मॉड्यूलद्वारे जवळच्या एफआरआरओ / एफआरओ यांच्याशी संपर्क साधावा. यासंदर्भातील अधिसूचना ब्युरो ऑफ इमिग्रेशन (बीओआय) द्वारे जारी केली जात आहे.

याशिवाय भारतीय नागरिकांना प्रवासाबाबत आधीच देण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारताच्या नागरिकांना फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीचा प्रवास सक्तीने टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

देशात कोविड-19 चे एकूण 50 रुग्ण आतापर्यंत निश्चित झाले आहेत. काल 44 पॉझिटिव्ह रुग्ण जाहीर झाल्यानंतरही तीन पॉझिटिव्ह रुग्ण बंगळुरू (जे अमेरिकेहून दुबईमार्गे प्रवास करून आले आहेत) मधून नोंदविले गेले आहेत; आणखी एक बंगळुरूमधून जे हॉर्थोमार्गे प्रवास करून अमेरिकेतून आले आहेत, आणि दोन पॉझिटिव्ह रुग्ण पुणे येथे (दुबई येथून आलेले). तीन केरळ येथील रुग्ण यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. या 50 रुग्णांपैकी 34 भारतीय आणि 16 इटालियन आहेत. काल मुर्शिदाबाद आणि लडाख येथे दोन मृत्यूंची नोंद करण्यात आली. माध्यमांद्वारे ते दोन कोविड-19 चे निगेटिव्ह असल्याचे समजले होते.

आजच्या तारखेपर्यंत 1400 पेक्षा अधिक जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. शिवाय 404 भारतीय संपर्कांची तपासणी केलेल्या अमेरिकन नागरिकाला भूतानमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याबाबत समजले आणि आसाम येथे निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

याशिवाय, इराण येथून पहिल्या गटातील सोडण्यात आलेले 58 जण, 25 पुरुष 31 महिला आणि 2 बालके आज दाखल झाली. आयएएफ सी-17 विमान आज सकाळी 9.27 वाजता आले. सर्व ठिकाणी देखरेख होत असून सर्व रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत.

 

 

 

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane(Release ID: 1605969) Visitor Counter : 212


Read this release in: English