Posted On:
08 MAR 2020 4:52PM by PIB Mumbai
पुणे, 8 मार्च 2020
कचरा वेचक संघटनेला स्वच्छता सेविका संघटना म्हटले पाहिजे कारण त्या देशाची खूप मोठी सेवा करत आहेत असे प्रतिपादन पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी केले, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थे द्वारा आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी त्यांनी स्वच्छता सेविकांची संवाद साधला.

मी नेहमी माझी दिवाळी स्वच्छता सेविका आणि इतर सफाई कर्मचारी बरोबर साजरी करतो ज्यातून मला त्यांचे काम जाणून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांना समजून घेणे शक्य होते असे ते म्हणाले आपणा सर्वांना कचरा शेडची गरज असते परंतु कुणालाही ती आपल्या घराजवळ नको असते हा दृष्टिकोन बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली खासदार निधीतून मी पन्नास मोठ्या आणि 50 छोट्या शेड तयार करण्यासाठी निधी देण्याचे ठरवले आहे हा निधी स्वच्छ संघटनेद्वारे डिझाईन केलेल्या शेड बनवण्यासाठी वापरण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले

देशांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढला असून त्याचबरोबर त्यांच्या विल्हेवाटीसाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सॅनिटरी नॅपकिन उत्पादकांना प्रत्येक नॅपकिन बरोबर विल्हेवाटीसाठी पिशवी देणे बंधनकारक आहे परंतु हा नियम काटेकोरपणे पाळला जात नाही तर जानेवारी 2021 पासून तो सर्वांना बंधनकारक राहील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली
शैक्षणिक संस्था, हाउसिंग कॉलनी यांनी आपल्या परिसरातच कचरा जिरवला पाहिजे. नगर परिषद असलेल्या शहरांना कचरा व्यवस्थापनाची सक्ती आहे परंतु यापुढे 3000 पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक राहील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. यांसारखे छोटे-छोटे उपक्रमच आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करायला मदत करतील असे ते म्हणाले

महिलांमध्ये सातत्य, दया, धैर्य आणि निर्णयक्षमता असे चार महत्त्वाचे गुणधर्म असतात. आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनी मी इथे जमलेल्या स्वच्छता सेविकांना नमन करतो ज्या आपल्या स्वच्छ,, निरोगी, हिट आणि फिट भारताचे स्वप्न साकार करायला मदत करतील असे श्री जावडेकर म्हणाले.
स्वच्छ संघटनेच्या संस्थापिका लक्ष्मीनारायण याप्रसंगी म्हणाल्या की कचऱ्याची विल्हेवाट ही विकेंद्रित पद्धतीने लाभली पाहिजे कचऱ्याच्या वाहतुकीसाठी खर्च होणारा पैसा तो कचरा आसपासच्या परिसरातच जिरवण्यासाठी व त्यातून खत निर्मितीसाठी वापरला गेला पाहिजे तसेच टाकाऊ प्लास्टिक विकत घेणाऱ्या कंपन्यांचे प्लांट जर पुण्यातच असतील तर ते खुप मदतीचे ठरेल.

3500 स्वच्छता सेविकांचे प्रतिनिधित्व करत श्रीमती राणी शिवशरण यावेळी म्हणाल्या की कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये स्वतंत्र जागा मिळाल्यास स्वच्छता सेविकांना खूप फायद्याचे ठरेल तसेच व्ही कलेक्ट सारखे उपक्रम आम्हाला घरांमधील निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळवायला मदत करतात.
पुण्याचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ ही याप्रसंगी उपस्थित होते, त्यांनी यावेळी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
***
RT/MC/DR