सांस्कृतिक मंत्रालय

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एएसआय संरक्षित सर्व सशुल्क स्मारके भारत आणि परदेशातील सर्व महिला अभ्यागतांसाठी विनामूल्य असतील - प्रल्हाद सिंग पटेल


भारतीय पुरातत्व सर्वेक्षण स्मारकांना भेट देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी पूर्णपणे वचनबद्ध - प्रल्हाद सिंग पटेल

प्रविष्टि तिथि: 07 MAR 2020 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2020

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, ताजमहालसह सर्व एएसआय संरक्षित सशुल्क स्मारके भारत आणि परदेशातील सर्व महिला अभ्यागतांसाठी विनामूल्य असतील असे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)  प्रल्हाद सिंग पटेल यांनी घोषित केले आहे. महिलांचा आदर करण्याची भारताची मोठी परंपरा आहे आणि आमचा विश्वास आहे की जिथे महिलांना योग्य आदर दिला जातो तिथे  देवदेवतांना देखील वास्तव्य करायला आवडते आणि जिथे त्यांचा आदर केला जात नाही तिथे सर्व कृती निष्फळ ठरतात असे पटेल म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, जगातील महिलांच्या शक्तीला सांस्कृतिक मंत्रालयाकडून ही छोटीशी मानवंदना आहे. ते म्हणाले की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण स्मारकांना भेट देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी  पूर्णपणे वचनबद्ध आहे.  याच अनुषंगाने 29 ऑगस्ट 2020 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहालच्या परिसरात त्यांनी एका पाळणाघर आणि फीडिंग रूमचे उद्घाटन केले होते आणि त्यानंतर देशभरातील विविध स्मारकांच्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.
 

महिलांना स्मारकांच्या भेटीदरम्यान सुरक्षित आणि सुलभ अभ्यागत अनुभव देण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने पुढील तरतुदी केल्या आहेत:
- देशभरातील विविध स्मारकांच्या ठिकाणी बाळांना स्तनपान करण्यासाठी खोल्या / पाळणाघरे 
-स्मारकांना भेट देणाऱ्या महिलांसाठी स्वच्छ आणि नेटक्या शौचालयाची सुविधा.
- स्मारकांना भेट देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा गार्ड तैनात 
-लाल किल्ला आणि ताजमहाल अशा काही महत्वाच्या स्मारकांच्या ठिकाणी तिकिटे / टोकन खरेदी   करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र रांग.

- लाल किल्ला आणि ताजमहाल सारख्या काही महत्वाच्या स्मारकांच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी प्रवेशद्वार.
- एएसआय आणि सीआयएसएफच्या कर्मचार्‍यांसाठी ‘लिंग संवेदीकरण’  या विषयांवर नियमितपणे चर्चासत्रांसारखे विशेष उपक्रम 
- महिला प्रवाषांची तपासणी करण्यासाठी महिला सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1605676) आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English