पंतप्रधान कार्यालय

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


अफवा टाळा आणि कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास वैद्यकीय मदत घ्या : पंतप्रधान

हात जोडून नमस्ते करण्याची सवय पुन्हा नव्याने सुरु करण्याची ही योग्य वेळ - पंतप्रधान

Posted On: 07 MAR 2020 3:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लाभार्थ्यांशी आणि जन औषधी केंद्रांच्या दुकान मालकांशी संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले की कोरोना विषाणूच्या धोक्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. भारताकडेही अत्यंत कुशल डॉक्टर,  उत्तम वैद्यकीय संसाधने तसेच नागरिकांमध्ये संपूर्ण जागरूकता आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात जागरूक नागरिकांची खूप महत्वाची भूमिका असते, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की वारंवार हात धुण्याला जास्त महत्त्व देणे गरजेचे नाही. शिंकताना आणि खोकताना आपले तोंड आणि नाक झाकून घ्या जेणेकरून इतरांना संसर्ग होणार नाही अशी सूचना त्यांनी केली.

“कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झाल्याची खात्री पटलेल्या सर्व रुग्णांना आवश्यक देखरेखीखाली ठेवले जात आहेत. मात्र एखाद्या व्यक्तीला संशय आला असेल की तो संक्रमित जोडीदाराच्या संपर्कात आला होता, तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. जवळच्या रुग्णालयात तपासणीसाठी जावे. कुटुंबातील अन्य लोकांनाही संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांनी देखील आवश्यक त्या चाचण्या केल्या पाहिजेत”, असे पंतप्रधान म्हणाले.

कोरोना या साथीच्या रोगाबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

“आणि हो, संपूर्ण जग नमस्तेची सवय लावून घेत आहेत. काही कारणास्तव जर आपण ही सवय सोडून दिली असेल तर हात जोडून नमस्ते करण्याची सवय पुन्हा नव्याने लावून घेण्याची ही योग्य वेळ आहे’, असेही ते पुढे म्हणाले.

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane

 


(Release ID: 1605656) Visitor Counter : 184


Read this release in: English