रेल्वे मंत्रालय

होळी सणानिमित्त रेल्वेच्या 402 विशेष रेल्वेगाड्या

Posted On: 05 MAR 2020 6:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2020

 

होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मार्च महिन्यात 402 विशेष गाड्या चालवणार आहे तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांनाही अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. दिल्ली-पाटणा, दिल्ली-पुणे, मुंबई-वाराणसी, मुंबई-पाटणा, मुंबई-उडुपी, मुंबई-गया, अहमदाबाद-पाटणा, लखनौ-कोलकाता मार्गावर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

सर्व प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय पथके उपलब्ध आहेत तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 



(Release ID: 1605426) Visitor Counter : 71


Read this release in: English