रसायन आणि खते मंत्रालय

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी देशात औषधांची कमतरता नाही- सदानंद गौडा

Posted On: 05 MAR 2020 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2020

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी देशात औषधांची कमतरता नसल्याचे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री व्ही. सदानंद गौडा यांनी म्हटले आहे. ते आज गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. उत्तम निगराणी आणि देखरेख प्रणालीमुळे भारतात या रोगाचा प्रसार रोखण्यात सरकार यशस्वी ठरले आहे असे ते म्हणाले. कोरोनाच्या जागतिक संसर्गामुळे औषध क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असून अनेक संधीही खुल्या झाल्या आहेत असे ते म्हणाले. सक्रीय औषध निर्माण घटक (एपीआय) उत्पादनात भारताने स्वयंपूर्ण व्हायला हवे असे ते म्हणाले.

औषध निर्माण क्षेत्रात अमाप संधी आहेत. वाढती लोकसंख्या आणि आरोग्याप्रति वाढती जागरुकता यामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीला आणखी वाव असल्याचे ते म्हणाले. नवीन संधींचा योग्य वापर केल्यास देशातील औषध उद्योगांची उलाढाल 2025 पर्यंत 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत जाईल असे ते म्हणाले.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar



(Release ID: 1605391) Visitor Counter : 97


Read this release in: English