आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संबंधी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

Posted On: 04 MAR 2020 6:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 मार्च 2020

 

कोविड-19 रोगाचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केले. दिल्ली सरकार तसेच दिल्लीतील सरकारी रुग्णालयांचे संचालक आणि वैद्यकीय अधीक्षकांबरोबर त्यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. आतापर्यंत 78 देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली असून राज्य आणि केंद्र सरकारकडून अतिदक्षता बाळगली जात आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान यांनी म्हटले आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 विरुद्ध सज्ज राहण्याचे तसेच निगराणी, प्रयोगशाळेत निदान, दळणवळण व्यवस्थापनासाठी क्षमता अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यास त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यासाठी विलगीकरण सुविधा सज्ज ठेवायला सांगितले. तसेच वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून स्थानिक भाषांमध्ये जनजागृती करायची सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1605268) Visitor Counter : 101


Read this release in: English