आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबत ताजी माहिती
Posted On:
03 MAR 2020 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2020
आग्रा येथे नमुन्यांच्या तपासणीदरम्यान उच्च ज्वराचे सहा रुग्ण आढळले आहेत. नवी दिल्लीत काल आढळलेल्या कोविड-19 बाधित रुग्णाशी त्यांचा संपर्क झाला होता. त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पुष्टीसाठी पाठवण्यात आले आहेत.
एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (आयडीएसपी) नेटवर्कच्या माध्यमातून या सहा जणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1604999)
Visitor Counter : 141