अर्थ मंत्रालय
23 शेल कंपन्यांचा समावेश असलेल्या 7896 कोटी रुपयांचे बनावट चलन बनवणारे मुख्य रॅकेट उघडकीस आले
दोन आरोपींना अटक, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2020 2:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2020
दिल्ली पश्चिम आयुक्तालयाच्या केंद्रीय कर चुकवेगिरी प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी 7896 कोटी रुपयांचे बनावट चलन बनवणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यांनी 23 शेल कंपन्यांच्या जाळ्याचा वापर करुन प्रत्यक्ष मालाचा पुरवठा न करता बनावट चलनाद्वारे 1709 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले. याप्रकरणी दोघांना 29 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. या आरोपींनी बनावट चलने तयार करुन इनपुट क्रेडिट मिळवण्यासाठी अनेक नकली कंपन्यांची निर्मिती केली आहे. त्यांच्याकडून अनेक मोबाईल फोन्स, संगणक आणि अवैध कागदपत्रे जप्त करण्यात आली. पटियाला हाऊस न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरु आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1604960)
आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English