अर्थ मंत्रालय

436 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या बनवून कर परतावा घेताना कंपनीच्या मालकांना दिल्लीत अटक

Posted On: 02 MAR 2020 6:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मार्च 2020

 

वस्तू व सेवा कराच्या पूर्व दिल्ली आयुक्तालयाने आणि करचुकवेगिरी प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी मिळून बनावट पावत्या बनवून इनपूट टॅक्स क्रेडिट घेताना तीन जणांना पकडले आहे. हा गैरव्यवहार सुमारे 436 कोटी रुपयांचा असून त्यावर सुमारे 11 कोटी 55 लाख रुपयांचा कर परतावा मिळवण्याचा त्या तिघांचा प्रयत्न होता. यासाठी काही बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने हवाला व्यवहार चालवले जात होते.

आरोपींची नावे आसिफ खान, राजीव छटवाल आणि अर्जुन शर्मा अशी असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने त्यांना 13 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

 

M.Chopade/U.Raikar/P.Kor



(Release ID: 1604880) Visitor Counter : 90


Read this release in: English