अर्थ मंत्रालय

फेब्रुवारी 2020 मध्ये 1,05,366 कोटी रुपयांचा ढोबळ वस्तू आणि सेवा कर देशभरातून जमा

Posted On: 01 MAR 2020 7:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 मार्च 2020

 

फेब्रुवारी 2020 मध्ये देशभरातून एकूण 1,05,366 कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर जमा झाला असून त्यात केंद्रीय वस्तू व सेवा कर 20,569 कोटी रुपये राज्य वस्तू व सेवा कर 27,348 कोटी आणि एकिकृत वस्तू व सेवा कर 48,503 कोटी रुपये (आयातीवरचा 20,745 कोटींचा समावेश) इतका जमा झाला आहे. जानेवारी महिन्यासाठी भरलेले वस्तू सेवाकराचे परतावे 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत 83 लाख 53 हजार कोटी रुपयांचे आहेत.

सरकारने केंद्रीय वस्तू-सेवा कराच्या खात्यात 22 हजार 586 कोटी रुपयांचा तसेच राज्यांकडे 16 हजार 553 कोटी रुपयांचा भरणा केला असून त्यानंतर केंद्र आणि राज्याचा फेब्रुवारी 2020 मधला एकूण सीजीएसटी महसूल 43 हजार 155 कोटी रुपये आणि एसजीएसटीचा महसूल 43 हजार 901 कोटी रुपये इतका होता.

देशभरातून वस्तू सेवा करातून मिळालेला महसूल फेब्रुवारी 2019 च्या तुलनेत फेब्रुवारी 2020 मध्ये 12 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. आयातीवर मिळालेल्या वस्तू व सेवा कर पाहता फेब्रुवारी 2020 मध्ये मिळालेला एकूण महसूल फेब्रुवारी 2019 च्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढला आहे. आयातीवर मिळालेल्या वस्तू व सेवा करात गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी 2020 मध्ये अपेक्षित असलेल्या वाढीपेक्षा 2 घट दिसून आली.

देशभरातून सर्वात जास्त वस्तू व सेवा कर भरण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून फेब्रुवारी महिन्यात राज्यातून 15,735 कोटी रुपये इतका कर जमा झाला आहे. फेब्रुवारी 2019 च्या तुलनेत यावर्षीच्या फेब्रुवारीत यात 12 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

नागालँड आणि त्रिपूरा राज्यांमध्ये देशभरातून सगळ्यात कमी म्हणजे 25 कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कराचा भरणा झाला आहे.

 

B.Gokhale/U.Raikar/P.Kor



(Release ID: 1604817) Visitor Counter : 96


Read this release in: English