उपराष्ट्रपती कार्यालय
वास्तूरचनाकारांनी त्यांच्या योजनांच्या केंद्रस्थानी संवर्धन आणि टिकाऊपणाला प्राधान्य देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
Posted On:
28 FEB 2020 6:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2020
वास्तूरचनाकारांनी आणि शहर नियोजनकारांनी त्यांच्या योजनांच्या केंद्रस्थानी संवर्धन आणि टिकाऊपणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. बांधकाम क्षेत्रातल्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधण्याचे तसेच शाश्वत विकासाच्या दिशेने काम करावे असे ते म्हणाले.
ते आज तामिळनाडू येथे स्थापत्य कलेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. देशाचा अमूल्य संस्कृती आणि वारशाचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. वाढत्या शहरीकरणावर अभिनव तोडगा काढण्याचे आणि ग्रामीण भागात शहरी सुविधा निर्माण करण्याच्या उपाययोजनांचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
R.Tidake/S.Kane/P.Kor
(Release ID: 1604698)
Visitor Counter : 147