पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधल्या अहमदाबाद येथे नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात पंतप्रधानांचे प्रारंभिक वक्तव्य

Posted On: 24 FEB 2020 5:59PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2020

 

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

नमस्ते ट्रम्‍प, नमस्ते ट्रम्‍प, मी बोलेन India-US friendship तुम्ही म्हणाल long live- long live. India-US friendship, India-US friendship, India-US friendship।

नमस्ते,

आज मोटेरा स्टेडियम मध्ये एका नव्या इतिहासाची नोंद होत आहे. आज आपण इतिहासाची पुनरावृत्ती होताना देखील पाहात आहोत.  पाच महिन्यांपूर्वी मी माझ्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात ह्युस्टनमध्ये हौडी मोदी कार्यक्रमाने केली होती आणि  आज माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प आपल्या ऐतिहासिक भारत दौऱ्याची सुरुवात अहमदाबादमधून नमस्ते ट्रम्‍पने करत आहेत. तुम्ही कल्पना करू शकता ते अमेरिकेहून थेट येथे दाखल झाले आहेत. इतका दूरचा प्रवास केल्यावर भारतात उतरल्याबरोबरच राष्ट्राध्यक्ष ट्रम्‍प आणि त्यांच्या कुटुंबाने थेट साबरमती आश्रमाला भेट दिली आणि त्यानंतर ते या कार्यक्रमात आले आहेत. जगातील सर्वात मोठ्या या लोकशाहीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. ही भूमी गुजरातची आहे पण तुमच्या स्वागतासाठी उत्साह संपूर्ण भारताचा आहे. हा उत्साह, हा आसमंत व्यापून टाकणारा आवाज, हे संपूर्ण वातावरण विमानतळापासून येथे स्टेडियमपर्यंत सर्व बाजूला भारताच्या या विविधतेने रंगलेले रंग दृष्टीस पडत आहेत आणि या सर्वांमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्‍प, फर्स्ट लेडी मेलॅनीया ट्रम्‍प, इवांका आणि जॅरेड यांची उपस्थिती, राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कुटुंबासोबत येथे येणे भारत-अमेरिका यांच्या संबंधांना एखाद्या कुटुंबासारखी मधुरता आणि दृढतेची ओळख प्रदान करत आहे.

भारत-अमेरिका संबंध आता केवळ एका भागीदारीपुरते मर्यादित नाहीत, त्यापेक्षा ते अधिक काही आहेत आणि अतिशय घनिष्ठ आहेत. या कार्यक्रमाचे जे नाव आहे- ‘नमस्ते’. त्याचा अर्थ देखील खूपच जुना आहे. हा जगातील सर्वाधिक प्राचीन भाषांपैकी असलेल्या संस्कृत भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ केवळ व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या आत वसलेल्या देवत्वाला देखील आम्ही नमन करतो. इतक्या भव्य समारंभाच्या आयोजनासाठी मी गुजरातच्या जनतेचे, गुजरातमध्ये राहणाऱ्या इतर राज्याच्या लोकांचे अभिनंदन करत आहे. Mr. President, friend’s आज तुम्ही ज्या भूमीवर आहात त्या जागी एके काळी पाच हजार वर्षांपूर्वी नियोजनबद्ध शहर धोलवीरा होते आणि तितकेच जुने लोथल सागरी बंदर देखील होते. आज तुम्ही त्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहात जिचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अतिशय महत्त्वाचे स्थान होते. आज विविधतेने नटलेल्या त्या भारतात आहात जिथे शेकडो भाषा बोलल्या जातात, शेकडो प्रकारचे पोशाख आहेत, शेकडो प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, अनेक पंथ आहेत, समुदाय आहेत. आपली ही अतिशय समृद्ध विविधता आहे. विविधतेत एकता आहे आणि एकतेत चेतना हा भारत आणि अमेरिका यांच्यातील बळकट संबंधांचा खूप मोठा आधार आहे. एक Land of the Free  आहे तर दुसरा संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानत आहे. एकाला statue of liberty चा अभिमान आहे तर दुसऱ्याला जगातील सर्वात उंच शिल्प असलेल्या Statue of Unity चा गौरव आहे. आपल्यामध्ये कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्यांची आपण देवाणघेवाण करत आहोत. आपली मूल्ये आणि आदर्श, साहसी आणि नवनिर्मितीकारक वृत्ती, सामाईक संधी आणि आव्हाने, सामाईक आशा-आकांक्षा सारख्याच आहेत. अध्यक्ष ट्रम्‍प यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी घनिष्ट होत असल्याबद्दल मला  अतिशय आनंद होत आहे.

म्हणूनच राष्ट्राध्यक्ष ट्रम्‍प यांचा हा  भारत दौरा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबधांचा एक नवा अध्याय आहे. एक असा अध्याय जो अमेरिका व भारताच्या लोकांच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा नवा दस्तावेज बनेल.

 

मित्रांनो,

राष्ट्राध्यक्ष ट्रम्‍प खूप व्यापक विचार करतात  आणि अमेरिकावासीयांची स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांनी जे काही केले आहे त्याविषयी संपूर्ण जग चांगल्या प्रकारे परिचित आहे. आज आम्ही संपूर्ण ट्रम्‍प कुटुंबाचे विशेष स्वागत करत आहोत, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्‍प तुम्ही या ठिकाणी उपस्थित असणे आमच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे. निरोगी आणि आनंदी अमेरिकेसाठी तुम्ही जे काही केले आहे त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. समाजा बालकांसाठी तुम्ही जे काही काम करत आहात ते अतिशय प्रशंसनीय कार्य आहे. तुम्ही म्हणता- Be Best! आजच्या स्वागत समारंभात तुम्हाला लोकांकडून हीच भावना व्यक्त होत असल्याचा अनुभव असेल. इवान्का दोन वर्षांपूर्वी तुम्ही भारतात आला होता, तेव्हा तुम्ही म्हणाला होता की मला भारतात पुन्हा येण्याची इच्छा आहे. आज तुम्ही पुन्हा एकदा आमच्या सोबत आहात याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. तुमचे हार्दिक स्वागत आहे.

प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून दूर राहणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे जॅरेड, पण तुम्ही जे काम करता त्याचा प्रभाव खूपच जास्त असतो आण त्याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळी तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली त्यावेळी तुम्ही तुमच्या भारतीय मित्रांची बरीच विचारपूस केली. आज तुम्हाला या ठिकाणी पाहून मला अतिशय आनंद होत आहे.

 साथियों, आज या मंचावरून प्रत्येक भारतीय आणि अमेरिकेबरोबरच संपूर्ण जग President Trump यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे. त्यांच्या संबोधनानंतर त्यांचे आभार मानल्यावर मी तुमच्याशी आणखी काही गोष्टींविषयी बोलणार आहे. मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने  President Trump यांना निमंत्रित करत आहे. मित्रांनो, मी तुमच्या समोर माझे मित्र, भारताचे मित्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्रीयुत डोनाल्ड ट्रम्‍प यांना आमंत्रित करत आहे.

 

M.Chopade/S.Patil/P.Kor



(Release ID: 1604649) Visitor Counter : 92


Read this release in: English