माहिती आणि प्रसारण मंत्रालय

बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये जोरदार हजेरी लावत भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक सहकार्याबाबत अपेक्षा


मराठी चित्रपट 'स्थलपुराण' सह महोत्सवात तीन भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन

Posted On: 22 FEB 2020 6:22PM by PIB Mumbai

मुंबई, 22 फेब्रुवारी 2020

 

बर्लिन येथे सुरू झालेल्या तीन मोठ्या युरोपियन चित्रपट महोत्सवांपैकी - कॅन्स आणि व्हेनिस – भारतीय प्रतिनिधी मंडळ हे भारतीय चित्रपटांच्या सहनिर्मितीसाठी आणि भागीदारी विकसित करण्यासंबंधी व्यापक चर्चा करीत आहेत.

प्रतीक वत्स यांचा 'एब आले ऊ!', पुष्पेंद्र सिंग यांचा लैला और सात गीत आणि अक्षय इंदीकर यांचा स्थलपुराण – जुनाट जागा.. या तीन चित्रपटांमुळे भारतीय सिनेमे अधोरेखित झाले आहेत.

अक्षय इंदीकर यांचा मराठी चित्रपट 'स्थलपुराण' हा आठ वर्षाच्या दिघूची कथा सांगतो. वडील बेपत्ता झाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी तो तळमळीने प्रयत्न करतो. पण शेवटी शोध न लागल्याने कोकणात आयुष्याच्या संघर्षासह आजी-आजोबांबरोबर राहायला. चित्रपटाच्या कथेतील बदल आणि होणारा तोटा या दोन्ही बाजू या चित्रपटाद्वारे दाखविण्यात आल्या आहेत 

 

इंडीया नेटवर्किंग रिसेप्शन

बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय उद्योग महासंघाच्या सहयोगाने (सीआयआय) इंडिया नेटवर्किंग रिसेप्शन आयोजित केले होते. समारंभात प्रख्यात चित्रपट महोत्सव प्रमुख, आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटना, चित्रपट एजन्सीज आणि प्रख्यात निर्मिती संस्था एकत्र आल्या होत्या. भारताशी सहयोग वाढविण्यात त्यांनी रस दाखविला.

भारतीय प्रतिनिधी मंडळाने जागतिक चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी यावेळी चर्चा केली. त्यांनी भारताबरोबर इफ्फी (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) मध्ये काम करण्याबाबत उत्साहाने तयारी दाखविली आहे आणि सहभाग नोंदविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी मंडळाने इस्रायली पॅव्हिलिऑनचे कलात्मक दिग्दर्शक लायर ससून यांची भेट घेतला. इस्रायल इथल्या जेरूसलेम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या सहकार्याने काम करणे आणि त्यात भारताचे प्रदर्शन कसे राहील याबाबत तसेच इफ्फी 2020 मधील त्यांच्या सहभागाबाबत या वेळी चर्चा केली.

तसेच नॅशनल फिल्म अँड व्हिडिओ फाउंडेशन ऑफ साऊथ आफ्रिका (एनएफव्हीएफ)चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही भारतीय प्रतिनिधींनी भेट घेतली. आणि अनिमेशन, गेमिंग, आभासी वास्तव, संवर्धित वास्तव क्षेत्र आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याने पुढे येण्याबाबत चर्चा झाली.

रेनडान्स फिल्म फेस्टिव्हल, सनडान्स फिल्म फेस्टिव्हल, कान्स फिल्म फेस्टिव्हल, एडिनबर्ग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकाऱ्यांशी भारतीय प्रतिनिधी मंडळ या निमित्ताने चर्चा करणार आहे.    

 

भारतीय विभाग

तत्पूर्वी, बर्लिनेल येथील भारतीय चित्रपट विभागाचे उद्घाटन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. नोव्हेंबरमध्ये गोवा येथे होणाऱ्या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

बर्लिनमध्ये लक्षवेधी छाप पाडल्यानंतर फिल्म फॅसिलिटेशन ऑफिस (एफएफओ)च्या सहकार्याने एक खिडकी योजनेतून भारतात चित्रपटांचे चित्रीकरण करण्याबाबत आशादायी आहे. चित्रकर्मींना या माध्यमातून भारतातील 'सिनेमॅटिक टूरिझम' घडविण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. माध्यम आणि करमणुकीसाठी अग्रगण्य स्त्रोत म्हणून भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दृक्-श्राव्य सेवा क्षेत्राला भारत सरकारने यशस्वी सेवांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे.

 

 


B.Gokhale/S.Shiekh/D.Rane



(Release ID: 1604048) Visitor Counter : 124


Read this release in: English