रेल्वे मंत्रालय

रेल्वे प्रवाशांसाठी हिंदी भाषेतील चाटबोट ‘आस्कदिशा’चा शुभारंभ


प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऑनलाईन सेवा

Posted On: 21 FEB 2020 5:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2020

 

रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयआरसीटीसीने ‘आस्कदिशा’ हे नवी चाटबोट सुरू केले आहे. या सेवेची हिंदी आवृत्ती आजपासून सुरू करण्यात आली. कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत या सेवेअंतर्गत हिंदीतून रेल्वे प्रवाशांना मार्गदर्शन केले जाईल तसेच त्यांच्या तक्रारींवर तोडगा सांगितला जाईल.

रेल्वेच्या www.irctc.co.in या वेबसाईटवर ‘आस्कदिशा’ हे चाटबोट उपलब्ध असेल. यावर ग्राहक हिंदी भाषेत मेसेज करून अथवा आवाजी संदेशाच्या माध्यमातून आपल्या तक्रारी अथवा शंका विचारू शकतील.

ऑक्टोबर 2018 पासून सुरू झालेल्या इंग्रजी ‘आस्कदिशा’ या चाटबोटवर आतापर्यंत 10 अब्जांपेक्षा अधिक लोकांनी आपल्या शंका विचारून मार्गदर्शन घेतले आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1603966) Visitor Counter : 159


Read this release in: English