माहिती आणि प्रसारण मंत्रालय

70 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट उद्योग समुहातील धुरीणांचे संमेलन

प्रविष्टि तिथि: 21 FEB 2020 1:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2020

 

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच भारतीय उद्योग महासंघाने बर्निनेल 2020 येथे भारतीय चित्रपट उद्योग समुहातील विविध मान्यवरांचे संमेलन आयोजित केले होते. यावेळी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजक आणि निर्माते उपस्थित होते.

यावेळी ‘भारतातील चित्रपट’ या विषयावरची पुस्तिका देखील प्रकाशित करण्यात आली.

गोव्यात पुढच्या वर्षी होणाऱ्या 51 व्या इफ्फीसाठी चित्रपटांची सहनिर्मिती आणि भागीदारी विकसित करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. भारतात चित्रपट निर्मिती सुलभ आणि सहज करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

या संमेलनात इंडिया नेटवर्किंग इव्हिनिंगमध्ये सुमारे 100 जण सहभागी झाले होते. या शिष्टमंडळाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजक आणि बड्या फिल्म कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1603916) आगंतुक पटल : 133
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English