माहिती आणि प्रसारण मंत्रालय
70 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय कक्षाचे डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
20 FEB 2020 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2020
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय कक्षाचे उद्घाटन केले.
भारत आणि जग यांच्यातील भागीदारी बळकट करण्याची, समन्वय साधण्याची क्षमता चित्रपटात आहे, असे डॉ. जयशंकर यांनी उद्घाटन समारंभात सांगितले.
या महोत्सवातील भारताच्या भागीदारीमुळे चित्रपट क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बर्लिन महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रकर्मींना 51 व्या इफ्फीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन डॉ. जयशंकर यांनी केले.
गोव्यामध्ये यावर्षी साजऱ्या होणाऱ्या 51 व्या इफ्फी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या भित्तीपत्रिकेचे अनावरणही त्यांच्या हस्ते झाले.
जर्मनीतल्या बर्लिन येथे कालपासून बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला असून तो 1 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने या महोत्सवात सहभागी झाला आहे. भारतीय चित्रपट परदेशात लोकप्रिय करण्यासाठी महोत्सवात भारतीय कक्ष उभारण्यात आला आहे.
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1603849)
Visitor Counter : 127