मंत्रिमंडळ
‘बीआयएसएजी’ संस्थेला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा, आता इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणार
Posted On:
19 FEB 2020 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गुजरातमधल्या भास्कराचार्य इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅल्पिकेशन्स अँड जिओइंर्फमेटिक्स ( बीआयएसएजी ) या संस्थेला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थेचे कामकाज आता इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (एमईआटीवाय) मंत्रालयाअंतर्गत होणार आहे.
लाभ -
सेवा देणे आणि नवसंकल्पना प्रत्यक्षात आणताना संस्थेत कार्यरत असलेल्या विद्यमान मनुष्य बळाचा उपयोग राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये गरजेप्रमाणे करता येईल.
संस्थेच्या कार्याचा विस्तार करणे शक्य होईल.
जीआयएस प्रकल्प वेगाने पूर्ण करणे शक्य होईल.
संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान विकास यांच्यासाठी निधी उपलब्ध होवून त्याचा व्यापक उपयोग करणे शक्य होईल.
निर्णय घेण्यासाठी चांगली कार्यप्रणाली तयार करून नियोजन आणि सुप्रशासन शक्य होईल.
पृष्ठभूमी -
सध्या बीआयएसएजी ही संस्था गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत आहे. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये ही संस्था आहे. तसेच या संस्थेची नोंदणी अहमदाबाद चॅरिटी कमिशनर यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष म्हणून गुजरात सरकारचे मुख्य सचिव काम पाहतात. अंतराळ आणि तंत्रज्ञानविषयक कार्य करणा-या संस्थेला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर तिथे उच्च दर्जाचे संशोधन शक्य होणार आहे.
B.Gokhale/ S.Bedekar/P.Kor
(Release ID: 1603762)
Visitor Counter : 168