माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडिया/भारत 2020 संदर्भ ग्रंथाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
Posted On:
19 FEB 2020 5:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2020
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत इंडिया/भारत 2020 या वार्षिक संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन झाले. ‘हे पुस्तक म्हणजे सर्व लोकांसाठी संपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे, विशेषत: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे’, असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक तयार केल्याबद्दल त्यांनी या विभागाचे अभिनंदन केले. गेल्या काही वर्षात हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले आहे, असेही ते म्हणाले.
जावडेकरांच्या हस्ते यावेळी या पुस्तकाच्या ई आवृत्तीचेही प्रकाशन झाले. ही ई आवृत्ती टॅबलेट, कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोनवर वाचता येईल.
या पुस्तकाची किंमत 300 रुपये इतकी असून ही आवृत्ती 225 रुपयांत उपलब्ध आहे. येत्या 20 फेब्रुवारी 2020 पासून प्रकाशन विभागाच्या संकेतस्थळावरून पुस्तक खरेदी करता येईल. संकेतस्थळाची लिंक हे पुस्तक ॲमेझॉन आणि गुगल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1603680)
Visitor Counter : 150