कृषी मंत्रालय
2019-20 या वर्षासाठी अन्नधान्य, तेलबिया आणि इतर पीकांचा दुसरा सुधारित अंदाज
Posted On:
18 FEB 2020 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2020
2019-20 या वर्षासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने महत्वाच्या पीकांच्या उत्पादनाचा दुसरा अंदाज प्रकाशित केला आहे. या वर्षात अनेक पीकांचे उत्पादन सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अन्नधान्य-291.95 दशलक्ष टन (विक्रमी)
तांदूळ- 117.47 दशलक्ष टन (विक्रमी)
गहू- 106.21 दशलक्ष टन (विक्रमी)
मका- 28.08 दशलक्ष टन
डाळी-3.69 दशलक्ष टन
तेलबिया-34.19 दशलक्ष टन
सोयाबीन-13.63 दशलक्ष टन
भुईमूग- 8.24 दशलक्ष टन
कापूस- 34.89 दशलक्ष गासडी (प्रत्येकी 170 किलो)
दुसऱ्या अंदाजानुसार देशात 291.95 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईल असे अनुमान वर्तवण्यात आले आहे. 2018-19 या वर्षातल्या 285.21 दशलक्ष टन या अन्नधान्य उत्पादनापेक्षा हे उत्पादन 6.74 दशलक्ष टन अधिक राहील.
S.Thakur/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1603551)
Visitor Counter : 187