संरक्षण मंत्रालय
डिफेन्स स्टडीज् ॲन्ड ॲनलिसिस संस्थेला मनोहर पर्रिकर यांचे नाव
Posted On:
18 FEB 2020 3:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2020
संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेला माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नांव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता या संस्थेचे नाव मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था असे राहील.
9 नोव्हेंबर 2014 ते 14 मार्च 2017 या काळात पर्रिकर यांनी संरक्षण मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. या काळात पठाणकोट आणि उरी हल्ल्यासारख्या खडतर आव्हानांना तोंड द्यावे लागले मात्र पर्रिकर यांनी धाडसी पावले उचलत त्याला प्रत्युत्तर दिले.
त्यांच्या कार्यकाळात भारताच्या संरक्षण सामर्थ्यात भर घालणारे तसेच स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देणारे अनेक निर्णय झाले. वन रँक वन पेन्शन या अनेक वर्षापासूनच्या मागणीच्या अंमलबजावणी प्रती पर्रिकर यांचे मोठे योगदान राहिले.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1603520)