उपराष्ट्रपती कार्यालय

व्यवस्थेचा अनुचित लाभ घेणाऱ्या तत्वांना वर्ज्य करणे उद्योग क्षेत्राचे कर्तव्य- उपराष्ट्रपती

Posted On: 17 FEB 2020 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2020

 

भारतीय उद्योग क्षेत्रात नैतिक कंपनी प्रशासनाच्या गरजेवर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी भर दिला आहे.

जमशेदपूर शहराच्या शताब्दी वर्ष समारंभात ते आज बोलत होते. काही जण यंत्रणेचा अनुचित लाभ घेतात अशा तत्वांना वर्ज्य करणे हे उद्योग क्षेत्राचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

कंपनीची मूल्य, निती नियम आणि सामाजिक जबाबदारी यांची कंपनीचा नावलौकिक उभारण्यात महत्वाची भूमिका असते असे सांगत नैतिकतेला धरुन केलेल्या व्यवसायामुळे ग्राहक आणि गुंतवणुकदारात विश्वास निर्माण होतो. उच्च नैतिक मूल्य आणि उद्योगजकतेच्या भावनेची जोपासना करणारा अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी टाटा समूहाची प्रशंसा केली.

उद्योग आणि कृषी हे राष्ट्राचे दोन डोळे आहेत असे सांगून सरकारचे आर्थिक प्रगतीचे नियोजित उद्दीष्ट साध्य करण्यासाठी उद्योगाने त्याला पोषक प्रयत्न करायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी हे विकासाचे उत्तम मॉडेल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1603464) Visitor Counter : 114


Read this release in: English