पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

स्थलांतरित प्रजातीबाबत संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेचे तीन वर्षासाठीचे अध्यक्षपद भारताने स्वीकारले

Posted On: 17 FEB 2020 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2020

 

स्थलांतरित प्रजातींच्या 13 व्या सीओपी परिषदेला आज गांधीनगर येथे सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिषदेचे उद्‌घाटन केले. वरिष्ठ सरकारी अधिकारी, 130 देशातले पर्यावरण तज्ञ, कार्यकर्ते, संशोधक या परिषदेला उपस्थित आहेत.

जैवविविधतेच्या मुद्यांवर सामुहिक दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित करत भारताने येत्या तीन वर्षासाठी सीओपी अध्यक्षपद स्वीकारले. स्थलांतरित प्रजातीविषयीची ही परिषद भारतासाठी महत्वाची आहे असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अध्यक्षपद स्वीकारताना सांगितले.

स्थलांतरीत पक्षी, जल प्रजाती, त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर धोक्यात असून त्यांच्या संरक्षणासाठी सर्व देशांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1603461) Visitor Counter : 130


Read this release in: English